Breaking News

Tag Archives: राज्य मंत्रिमंडळाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय न्यायालयाचा स्तर वाढविणे, गावठाणामध्ये सुविधा पुरविणे यासह घेतले महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत बहुतांश निर्णय हे पुणे जिल्ह्यातील आहेत. या निर्णयामध्ये पुणे जिल्ह्यातील पौड येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय होणार,  पुनर्वसित ३३२ गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी ५९९ कोटी ७५ लाखांचा कृती कार्यक्रम, विविध विभागांकडील माहितीच्या प्रभावी, पारदर्शक वापरासाठी महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरण, प्राधिकरण स्थापन, …

Read More »

ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी ठाणे जनता सहकारी बँकेत खाते उघडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ठाणे जनता सहकारी बँक आर्थिक सक्षमता आणि नियमानुकूल व्यावसायिकतेचे निकष पूर्ण करत असल्याने तसेच रिझर्व बँकेने विहीत …

Read More »

राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; ३६४ पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे ३४६ पदांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या दोन सिंचन प्रकल्पांच्या खर्चास मान्यता म्हैसाळ उपसा सिंचन कार्यक्षमता निधी, जळगावातील लोंढे बँरेजच्या निधीस मान्यता

मागील अनेक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंचन प्रकल्पांच्या वाढीव निधीस मंजूरी देण्याचे प्रकल्प याही बैठकीत आणण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय जळगावातील लोंढे बँरेज प्रकल्पासाठीही १ हजार २७५ कोटी ७८ लाखांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन प्रकल्पास मंजूरीः निर्णय काही दोन-तीनच्या पुढे सरकेना पालघरमधील देहरजी आणि पुण्यातील जनाई शिरसाई वाढीव प्रकल्पास मान्यता

राज्यात भाजपा आणि महायुतीला जनतेने मोठ्या प्रमाणावर मतांचे दान देत विश्वास दाखविला. मात्र राज्यात सरकार स्थापन होऊन, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन महिने झाले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची संख्या काही केल्या दोन ते तीनच्या पुढे जायला तयार नाही. त्यातच आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकतर जलसंधारण प्रकल्पाच्या वाढीव खर्चास नाही जर …

Read More »

आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयः महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक …

Read More »

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय

राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …

Read More »

राष्ट्रीय दुःखवटा जाहीर असतानाही राज्य सरकारने घेतली मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

काल रात्री उशीरा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर देशातील त्यांच्या उद्योगाचा विस्तार आणि त्यांच्या प्रती जनसामान्यांसह उद्योग विश्वात असलेल्या आदराप्रती केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक दिवसाचा दुःखवटा जाहिर केला. हा दुःखवटा जाहिर केल्यानंतर सर्व शासकिय कार्यक्रम रद्द करण्यात येतात आणि पुढे ढकलण्यात …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे आणखी १७ महत्वाचे निर्णय तांड्याबाबत लोकसंख्येची अट शिथील, विविध समुदायासाठी महामंडळे स्थापण्याचा निर्णय

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील विविध जात आणि धार्मिक समुदायांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेण्याचा सपाटा राज्य सरकारने सुरु केला आहे. आज एकूण ३३ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. त्यापैकी १७ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती खालील प्रमाणे आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »