समुद्राच्या पाण्याचे विलोपन (Desalination) हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुंबई शहर व उपनगरातील पाणीपुरवठाविषयी लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,मुंबईतील वाढत्या पाणीटंचाईला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा घेतला आढावा हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »उच्च न्यायालयात मुबंई महापालिकेची माहिती, काँक्रिटीकरण करताना कमीतकमी वृक्षतोड मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरु
मुंबई ही मुसळधार पावसासाठी ओळखली जातो. पावसामुळेच मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी होते आणि मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा म्हणून सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याचा दावा महानगरपालिकेने आपल्या या प्रकल्पाचे उच्च न्यायालयात समर्थन केला आहे. काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याला प्राधान्य देताना कमीतकमी वृक्षतोड …
Read More »मुंबई महापालिकेचा खुलासा, मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये
बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य …
Read More »उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेची माहिती, १४०० कोटींचे सफाई कंत्राट रद्द निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिकेवर नामुष्की
झोपडपट्ट्यांतील सफाईचे कंत्राट बेरोजगारांच्या संस्थेला देण्याचे राज्य शासनाचे धोरण असताना महापालिकेने मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेऐवजी अन्य संस्थांना कंत्राट देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेवर मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. महापालिकेने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …
Read More »बेघरांच्या नजरेतून मुंबईची टिपलेली छायाचित्रे अचंबित करणारी माय मुंबई प्रोजेक्ट फोटो' प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
जे स्वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टीपेलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजाने नाकारलेल्या बेघरांच्या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौराद्गार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. निमित्त होते, ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे ! ‘पहचान’ संस्थेच्या माध्यमातून ५० बेघर नागरिकांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नाही तर अदानीच्या ‘लगान’ वसुलीसाठी झोपडपट्टीतील छोट्या व्यावसायिकांवर कर आकारणी मोठा आर्थिक आघात, मुंबईकरांचा आर्थिक कणा मोडणा-या निर्णयाला काँग्रेसचा विरोध
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा जुमलेबाजी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना लुटून लाडके उद्योगपती व लाडके कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. मुंबईतील छोट्या उद्योगांवर कर आकारण्याचा निर्णय हा कष्टकरी मुंबईकरांना लुटणारा आहे. दोनपैकी एक मुंबईकर झोपडपट्टीत राहत असल्याने हा त्यांच्यावरचा मोठा आर्थिक आघात आहे, त्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल बीएमसीच्या या …
Read More »केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्णः वर्ष समाज उपयोगी ठरावे सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम
केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून संस्थेचे हे वर्ष समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »शुद्ध हवेच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि बीएमसीला विचारणा वायू प्रदुषण कमी करण्यासाठी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज
मुंबईतील ‘कठोर’ वायू प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त करताना अधिकाऱ्यांना सांगितले की, हवा शुद्ध करण्यासाठी वाऱ्यावर देवावर विसंबून राहू शकत नाही, त्याऐवजी अधिकाऱ्यांनी शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही ‘इच्छाशक्ती’ दाखवण्याची गरज आहे असे मतही यावेळी व्यक्त केले. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती …
Read More »पुढील सुनावणीपर्यंत सैफी रुग्णालयाबाहेरील पादचारी पुलाच्या बांधकामाला अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश
दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकाबाहेरील प्रस्तावित पादचारी पुलाचे काम पुढील आदेश येईपर्यंत करू नये, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. चर्नी रोड स्थनकाच्या पूर्व प्रवेशाद्वाराबाहेर महर्षी कर्वे रोड ओलांडून सैफी रुग्णालयासमोर उतरणाऱ्या या प्रस्तावित पादचारी पुलाच्या बांधकामाला सैफी रुग्णालयाच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या …
Read More »