Breaking News

Tag Archives: मंत्रिमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करणार

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत असेल. आयोगाचे अध्यक्ष …

Read More »

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात maitri.maharashtra.gov.in या पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या अनावरण प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्रिमंडळातील सदस्य …

Read More »

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारचा ऐवजी आता मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकार

मागील काही वर्षापासून राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याला त्याची सेवा पूर्ण झाली असेल किंवा त्याच्या सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला असेल अशा आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त पदी करण्याचा अधिकार यापूर्वी राज्य सरकारला होता. मात्र आता अशा सनदी अधिकाऱ्याचे नाव सुचविण्याचे अर्थात शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

भाग-२ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय शासकिय दुःखवटा असूनही निवडणूकीसाठी निर्णयांचा सपाटा

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ निर्णयाचा सपाटाचा लावला असून भविष्काळात राज्य सरकारमध्ये वापसी होते का नाही या विंवचनेत असलेल्या महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या या सुरु असलेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा घेण्यात आली. तसेच विद्यमान राज्य सरकारच्या हिंतसंबधाशी संबधित अनेक निर्णय घेतले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाची उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली, भारतरत्न देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजूरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला (PM-RKVY) मंजुरी दिली, ज्याचे उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि कृषोन्नती योजनेला (KY) स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा प्राप्त करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या एकत्रित प्रस्तावित खर्चासह आहे. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दोन योजना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देतील ज्यात …

Read More »

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करणार सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते, मात्र त्याऐवजी या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित ३६ हजार ९६४ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी खर्च अपेक्षित होता. …

Read More »

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्प-२ ला गती देणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४९ कोटीच्या खर्चास मान्यता

विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी १४९ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे प्रमुख घेतले निर्णय १३ विषयावर घेतला निर्णय

विधानसभा निवडूकांना कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसा राज्य सरकारकडून राज्यातील विविध घटकांना आणि खुष करण्याचा आणि केंद्राच्या धोरणाप्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटाचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये सिंचनाचा निर्णय, प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय, लहान शहरातील विकास प्रकल्पांसाठी कर्ज उभारणीस …

Read More »

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या …

Read More »