Breaking News

Tag Archives: भ्रष्टाचार

वर्षा गायकवाड यांची मागणी , फ्रेंच कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीएवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करा

भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व  आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी …

Read More »

नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.

देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण… बॅटरी स्प्रेअरचा दर २४५० रुपये असताना ३४२५.६० रुपयाने खरेदी, मर्जीतील अपात्र कंपन्यांना पुरवठ्याचे कंत्राट बहाल

महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या आशिर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने …

Read More »

धनंजय मुंडे यांचा पलटवार, अंजली बदनामीया… अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे व बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम, त्यांना माझ्या शुभेच्छा

मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली …

Read More »

अंजली दमानिया यांचा आरोप, धनंजय मुंडेनी कमी किंमतीचा माल जास्तीच्या पैशात खरेदी केला नॅनो युरिया बॅग खरेदीत मोठा घोटाळा राजीनामा घ्याच

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्यातील घनिष्ठ संबधाचा पर्दापाश सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यानंतर अंजली दमानिया यांनी माजी कृषी मंत्री आणि विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा सादर करणार असल्याचे …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; एसटी भाडेवाढीची जबाबदारी मंत्र्यांना झटकता येणार नाही

विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द …

Read More »

भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’

भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या …

Read More »

‘भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका..’अस का म्हणाला हा अभिनेता

भ्रष्टाचार महाराष्ट्राला लागलेली कीड असून ‘तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’ असं म्हणत अभिनेत्याने सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराचा विरोध केलं आहे. इंडियन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये सैराट फेम मराठी अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाला होता. वॉकेथॉनमध्ये आकाश याने भ्रष्टाचारविरोधात मोठं विधान केलं आहे. …

Read More »

कोरोना काळात महापालिकेच्या खिचडी वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार खा. संजय राऊत यांच्या नातलगांना झाला लाभ -भाजपा नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैया यांचा आरोप

कोरोना काळात मुंबई महापालिकेने स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्यासाठी राबविलेल्या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून खा. संजय राऊत यांची कन्या, भाऊ तसेच निकटवर्तीयांना या भ्रष्टाचारात लाखो रुपयांचा लाभ झाला आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. डॉ . किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालून भ्रष्टाचारमुक्त करा

मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे, पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस …

Read More »