Breaking News

Tag Archives: भाजपा

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा …

Read More »

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, … काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती

अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी …

Read More »

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …

Read More »

भाजपाशी सलगीच्या चर्चा? म्हणजे आमचा मोठा अपमान जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली खंत

जयंत पाटील आणि मी शरद पवारांसोबत आहोत. मी मरेपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. मात्र जयंत पाटील आणि माझ्याविषयी भाजपाशी सलगीच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. तशा चर्चा होणे म्हणजे आमचा मोठा आपमान आहे, असे शरद पवारांच्या विश्वासातले असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री …

Read More »

आशिष शेलार यांची टीका, उद्धव ठाकरेंची ओळख घरबशा मुख्यमंत्री भाजपाचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत जे केवळ घरातच बसून राहिले, त्यांना परफॉर्मन्स करणाऱ्या मंत्र्याबद्दलची माहिती काय असणार? त्यामुळे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राला ओळख घरबशा मुख्यमंत्री म्हणून झाली, तर देवेंद्र फडणवीस यांची ओळख परफॉर्मन्स मंत्री म्हणून झाली, असा घणाघात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. काल भाषण करताना उद्धव ठाकरे …

Read More »

पुढील २४ ते ४८ तासात बेस्ट ची सेवा पूर्ववत होणार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपवार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, सुनो द्रोपदी….. मणिपूरवरून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती, राज्यपालांवर साधला निशाणा

मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, नकारात्मक विचाराच्या बाहेर…. देशभरात पाचशे आठ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. २४,४७० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील ४९, महाराष्ट्रातील …

Read More »