एसटी महामंडळाने मध्यंतरी एसटी बसेस भाड्याने घेण्याबाबतचा निर्णय घेतला. तसेच त्यासंदर्भातील जी निविदा काढण्यात आली आणि त्यासंदर्भातील वर्क ऑर्डरचे आदेश मागीलवेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच ही निविदा प्रक्रिया नियमानुसार असल्याचे सभागृहात सांगितले. मात्र आता विद्यमान मुख्यमंत्री त्यासंदर्भात स्थगिती आदेश देत आहेत असा मुद्दा विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी …
Read More »एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफ पैशांवरून अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी कामगारांचा संप झाला तरी पगारवाढ दिली
मागील अनेक वर्षापासून राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कितीही नफ्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला तरी एसटी महामंडळ काही केल्या फायद्यात येताना दिसत नाही. त्यातच एसटी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पैसे पीएफच्या कार्यालयात जमाच केले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यावरून …
Read More »रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती
राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे आता ‘अल्कोहोल’ सोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येईल. ड्रग्स सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन
राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. १ मार्च ‘परिवहन दिन’ या दिवसाचे …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करा सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (security audit) करण्यात यावे.तसेच बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला सुरक्षा रक्षक नेमणार महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता …
Read More »येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून “स्कूल बसेस” साठी नियमावली लागू करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप …
Read More »“उन्नत पॉडकार” वाहतूक ही भविष्यातील नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल… परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आशा
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ” उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया …
Read More »ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून सभासद नोंदणी आणि बक्षिस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास
महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. ” या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे ” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो …
Read More »एकनाथ शिंदे यांचे निर्देश, ड्रायव्हर, कंडक्टरसाठी वातानुकुलित विश्रांती गृह बांधा प्रत्येक एसटी स्टँडवर उपलब्ध करून द्या
एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन …
Read More »एकनाथ शिंदे यांना धक्काः आयएएस संजय सेठी यांची एसटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नियुक्ती
मुंबई राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी लोकप्रतिनिधी ऐवजी आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो, कारण गेल्या दशकापासून परिवहन मंत्री किंवा इतर कोणीतरी लोकप्रतिनिधी या पदावर विराजमान आहेत. सध्या परिवहन विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री …
Read More »