Breaking News

Tag Archives: गणेश नाईक

वाघ-बिबट्यांचे हल्ले, गावांना साळखी कुंपण घालण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी साखळी कुंपनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे जनतेत रोष आहे. या प्रकरणी लोकांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बिबट्याच्या हल्ल्यात देखील लोकांची जीवित हानी होत आहे. त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे अशी मागणी …

Read More »

मतदार यादीत घोळ केल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्या आमदाराकीला आव्हान उच्च न्यायालयाने गणेश नाईक यांना बजावली नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मतदार यादीत घोळ केल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेचे योग्यरित्या पालन न केल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. याचिकेची दखल घेऊन सोमवारी उच्च न्यायालयाने नाईक यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, …

Read More »

गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट, ३ वाघ आणि बिबट्याचा मृत्यू कोंबडीमुळे वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना

वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी …

Read More »

नरेश मस्के यांच्या उमेदवारीच्या विरोधात भाजपाच्या ६४ नगरसेवकांचे राजीनामे

लोकसभा निवडणूकीसाठी पुरेसे उमेदवार शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडे नसल्याने शिवसेना शिंदे गटाकडून एकतर विद्यमान आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली. तर काही नवे चेहरेही लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने दिले. मात्र ठाणे मधून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश मस्के यांना शिवसेना शिंदे गटाने दिलेली उमेदवारी नवी मुंबईतील भाजपाचे गणेश नाईक यांच्या समर्थकांना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्ट संकेत, नवी मुंबईतील रहिवाशांना मिळणार मालमत्ता कर माफी नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय …

Read More »