Breaking News

शरद पवार म्हणाले, डॉ. दाभोळकरांच्या तपासासारखे राजपूतच्या केसमध्ये होवू नये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पवारांचा सीबीआयला टोला

मुंबई : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत राज्य सरकारकडून करण्यात येवून सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत दुसऱ्याबाजूला मात्र सीबीआयच्या निष्पक्ष कामाच्याबाबत अप्रत्यक्षरित्या प्रश्न उपस्थित करत अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येच्या तपासाबाबत जे झाले तसे अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या तपासाबाबत होवू नये अशी अपेक्षा त्यांनी ट्विट करत टोला लगावला.

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रमुख आणि संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे सकाळी हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लवकरात लवकर घेण्यासाठी २०१४ साली राज्याच्या पोलिसांकडून त्याचा तपास काढून घेवून सीबीआयला देण्यात आला. मात्र आतापर्यत डॉ.दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध सीबीआयला घेता आला नाही. आता पुन्हा त्याचधर्तीवर राज्यातील पोलिसांकडून पुन्हा अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या हत्येचा तपास सीबीआयला सोपविण्यात आला.

यापार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त होत आहे. त्याचबरोबर पवारांनी सीबीआयच्या एकूणच कार्यपध्दतीबाबत अप्रत्यक्षरित्या संशय व्यक्त केला.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *