Breaking News

सुशांतसिंग राजपुतप्रकरणातील फेसबुक आणि ट्वीटर फेक अकाऊंटचे मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप करत असा सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाऊंट खोलण्यात आली. यातून सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी, मंत्र्यांची बदनामी करुन बिहारच्या निवडणूकीत राजकीय फायदा होईल यासाठी ही अकाऊंट खोलण्यात आल्याचा पर्दाफाश मिशीगन युनिव्हर्सिटीच्या नामांकित लोकांनी तयार केलेल्या अहवालात केल्याचे त्यांनी सांगितले.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपाने व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशीगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद आहे. दरम्यान एखाद्या खटल्याचा किंवा प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरू असताना कोणताही मिडिया ट्रायल होवू नये असा भविष्यामध्ये केंद्राने कायदा करावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Check Also

१४, २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या या तारखेला प्रसिध्द होणार राज्य निवडणूक आयोग लागले निवडणूकीच्या कामाला

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *