Breaking News

सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सलमानने अखेर सोडले मौन म्हणाला त्याच्या फॅनसोबत रहा

मुंबई: प्रतिनिधी
हिंदी चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांनी सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर यांच्यावर आरोप करत टीकेची झोड उठविली. त्यामुळे पहिल्यांदाच बॉलीवूडमधील अंतर्गत संघर्ष बाहेर आला. याबाबत सततचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. अखेर बॉलीवूड स्टार सलमान खानने आपले मौन सोडत आपल्या फॅन्सला म्हणाला, सुशांतसिंग राजपूतच्या फॅन सोबत रहा भलेही त्यांच्याकडूनही कितीही वाईट शब्द प्रयोग झाले तरी असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलीवूडमध्ये असलेल्या अंतर्गत टोळ्या, गॅग्ज आदींच्याबद्दल अनेक बातम्या बाहेर येवू लागल्या. तसेच कंपूमध्ये असणाऱ्या अभिनेत्री-अभिनेत्यालाच कसे काम मिळते याचे रसभरती अनेक किस्से बाहेर येवू लागले. यामध्ये निर्माती एकता कपूर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर आणि सलमान खान आणि बंधू यांच्यावर कंपूशाहीचा आरोप होत हे तिघेच राजपूतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची चर्चा आणि आरोप होवू लागले.
यापार्श्वऊमीवर चार दिवस टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सलमान खानने काल दुपारी ट्वीट करत या कठिण प्रसंगात कोणतेही वाईट शब्द न वापरता फॅन्सनी सुशांतसिंग राजपुतच्या फॅन्ससोबत राहण्याचा सल्ला दिला. त्यांच्या भावनेचा आदर करा त्यांना उलट प्रतित्तुर देवू नका असे आवाहनही त्याने केले.

 

Check Also

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *