Breaking News

सर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी

माहिती अधिकार कायद्यांतर्गंत मिळालेली कागदपत्रे ही खरीच आणि विश्वासार्ह असतील असे नसल्याची टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने करत वकिलांनी एकाच मुद्यावर अडून बसण्याचे सोडून द्यावे असा सल्लाही न्यायमुर्ती ए.एम.खानविलकर आणि न्या.संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने दिला.

अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आशिषकुमार सक्सेना यांनी अपील केले. त्या याचिवेकवरील सुणावनी वेळी न्यायालयाने वरील टिपण्णी केली.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेली कागद पत्रे ही विश्वासहार्य नसल्याचे आमच्या अनुभवाच्या आधारे स्पष्ट झाले आहे. एखाद्या विभागाने दिलेल्या कागदपत्रांवर उत्तर मागितले तर त्यावर सादर करण्यात आलेले उत्तर मात्र पूर्णत: वेगळे असते असे निरिक्षण ए.एम.खानविलकर यांनी नोंदविले.

एका जमिनीवरील इमारतींला पाडल्याप्रकरणी अलाहाबाद न्यायालयाने निर्णय दिला. या कारवाई संदर्भात याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास प्राधिकरणाने आरटीआई अंतर्गत दिलेली कागदपत्रे असून त्यामध्ये निवासी इमारतीचे डिमार्केशन केल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच गोरखपूर विकास प्राधिकरणाने अवैध पध्दतीने खाजगी जमिनीवरील बांधकाम पाडत असल्याचे सांगत यास तात्काळ स्थगिती न दिल्यास ६ कुटुंबातील २५ नागरीक बेघर होणार असल्याची भीती व्यक्त केली.

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसल्याचे निरिक्षण नोंदवित टिपण्णी मौखिक टिपण्णी केली. तसेच यावरील पुढील सुणावनी ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले.

 

Check Also

विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *