Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी- प्रकृती उत्तम, लवकरच कामावर रूजू सीएमओ कार्यालय आणि खासदार संजय राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. तर पुढील तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री कामावर रूजू होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली.

मानेच्या दुखण्यामुळे काल रूग्णालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दाखल करण्यात आल्यानंतर आज सकाळी ७.३० च्या सुमारास त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. त्यानंतर ८.४५ वाजता ऑफरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. जवळपास एक तास त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे रूग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले. डॉ अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आणि आज शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी लवकर बरे होवून परत या असे ट्विट करत त्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी मनोकामना केली.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *