Breaking News

तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

तूर खरेदीचा आढावा आज सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात १९१ खरेदी केंद्रावर  ९ एप्रिलपर्यत २१ लक्ष ५० हजार ६४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन विभागाने दिली.

सहकारमंत्री म्हणाले, तूर साठवणुकीसाठी १ हजार टनापेक्षा कमी साठवणूक क्षमता असलेली लहान गोदाम सुध्दा ताब्यात घेण्यात यावेत. खासगी, पतसंस्थेची किंवा जी अन्य गोदाम  उपलब्ध होतील ती ताब्यात घ्यावीत. तसेच शेतक-यांनी १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *