Breaking News

घर खरेदी, जमिन व्यवहार आता ऑफिशियली स्वस्त: २०२१ पर्यत सवलत मुद्रांक शुल्क सवलतीचा शासन निर्णयाचे गॅजेट झाले प्रसिध्द

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक उलाढाल मंदावली आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने घर खरेदी, जमिन खरेदी-विक्री व्यवहारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कावर सवलत देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यानुसार आज त्यासंदर्भातील गॅजेट सरकारकडून प्रसिध्द करण्यात आले.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२० पासून घर खरेदी-जमिन खरेदी-विक्री व्यवहारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात दोन टक्के इतकी सवलत मिळणार आहे. ही सवलत ३१ डिसेंबर २०२० पर्यत राहणार आहे. तर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी हीच सवलत दिड टक्के राहणार आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या खिशावर कमी ताण पडणार असून घर खरेदी-विक्री, जमिन विक्री-खरेदीच्या व्यवहाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे.

Check Also

औरंगाबादेत ऑफर नंदुरबारमध्ये सोबत? की कात्रजचा घाट… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *