Breaking News

शासन, महापालिकांच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी वाहनाची सोय करा सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्याच भागात बंद झाल्याने राज्य सरकार आणि महापालिकांच्या  अखत्यारीत असलेल्या रूग्णालयात कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयात पोहोचणे जिकरीचे होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना वेळेवर आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी मोफत वाहनाची किंवा खास वाहनाची सोय करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांनी एका पत्रकान्वये केली.

शासनाच्या व महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सेवा विभागातील प्रशासन  किंवा विभाग प्रमुखाने किंवा कार्यालय प्रमुखाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व  सद्दस्थितीत सर्व आरोग्य कर्मचारी, परिचारीका, आया, कक्षसेवक, स्ञी-परिचर व आरोग्यसेवक या सर्वांना हॉस्पीटल पर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय किंवा महापालिका प्रवासी वाहन किंवा इतर वाहनाची मोफत सोय करण्यात यावी व त्या कर्मचा-यांच्या शिफ्टप्रमाणे सदर सोय केल्यास ते विहित वेळेत रुग्णालयामध्ये रुग्णसेवेस उपस्थित राहू शकतील आणि शासनास व महापालिकेस योग्यरित्या सेवा देऊ शकतील असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयात सदरहू कर्मचा-यांची योग्यरित्या खाणे-पिणे व राहण्याची योग्य सोय केल्यास ते देखील सोयिस्कर होऊ शकेल. माझी शासनास नम्र विनंती आहे की सदरहू बाबींचा गंभीरपणे विचार करावा व आरोग्य सेवेत कार्यरत असणा-या सर्व कर्मचा-यांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सर्व सुख सोयी पुरविण्यात याव्यात. व कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्या-या या कर्मचा-यांचे मनोबल वाढविण्यास सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली.

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *