Breaking News

केंद्राची कोरोना रूग्णांसाठी नवी नियमावली : फक्त ३ दिवसात डिस्जार्च डिस्जार्च करताना चाचणीची आवश्यकता नाही

मराठी ई-बातम्या टीम

देशातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने बाधित रूग्णाला किती दिवस रूग्णालयात ठेवायचे आणि किती दिवसानंतर डिस्जार्च द्यायचा यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त तीन दिवसात रूग्णाला डिस्जार्च देण्यास सांगण्यात आले आहे.

डिसेंबर २०२१ अखेरीस पासून देशभरातील जवळपास सर्वच राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच राज्यांमध्ये या दोन्ही विषाणूबाधित रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु यातील अनेक रूग्ण हे सौम्य लक्षणे असलेली किंवा लक्षणे विरहीत असल्याचे आढळून येत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आपल्या क्लिनिकल मॅनेजमेंट नियमांमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे. या नव्या सुधारीत नियमानुसार आता गृह विलगीकरणात राहणारे आणि रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना तीन दिवसात जर कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर आणि लक्षणांचे ९३ टक्के सॅच्युरेशन झाले असेल तर अशा रूग्णासो ३ दिवसात डिस्जार्च देण्याची नवा नियम केंद्रीय आरोग्य विभागाने केला आहे.

जे रूग्ण ओमायक्रॉन किंवा कोरोनाबाधित रूग्ण जे गृह विलगीकरणात रहात आहेत. त्यांना सात दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. परंतु तीन दिवस त्यांना ताप आलेला नसेल तर पुन्हा अशा रूग्णाची चाचणी करण्याची गरज नसून त्यांना सात दिवसाच्या गृह विलगीकरणानंतर पुर्वीप्रमाणे बाहेर पडता येणार आहे.

मॉडरेट रूग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर जर तीन दिवसात सदर रूग्णांची लक्षणे ९३ टक्के सॅच्युरेशन झालेले आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नसतील तसेच त्यांना तीन दिवसात ताप आलेला नसेल अशा रूग्णांना पुन्हा चाचणी न करता घरी सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ज्या रूग्णांना ऑक्सीजन सपोर्टची आवश्यकता राहीली आहे अशा रूग्णांना मेडिकल ऑफिसरच्या सूचनेनुसार डिस्जार्च मिळणार आहे. मात्र सदरच्या रूग्णाला दिसून येणारी लक्षणे संपुष्टात आली असतील आणि त्यांना सलग तीन दिवस ऑक्सीजन सपोर्टशिवाय राहता आल्यास त्यांची पुन्हा चाचणी करण्याची गरज नसून त्यांना घरी सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय ज्यांना अनेक व्याधी आहेत किंवा ज्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लॅंट झाले किंवा एचआयव्ही पेशंट्स असतील अशा रूग्णांना या दोन्हीपैकी एका रूग्णांची लागण झाली असेल तर त्याबाबत मेडिकल अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसारच डिस्जार्च देण्याची सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

याचबरोबर हेल्थ वर्कर म्हणून काम करणाऱ्यांसाठीही केंद्रीय आरोग्य विभागाने नवी नियमावली जाहीर केली असून नोकरीवर असताना हेल्थ वर्करने पीपीई कीट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पुरेशी काळजी घेण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर, सतत हात धुणे आदी गोष्टी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर हेल्थ वर्करला नोकरीवर असताना विषाणूची लागण झाली असेल तर त्यास तात्काळ विलगीकरणात ठेवण्यात यावे. त्याचबरोबर एखादे पीपीई किट योग्य पध्दतीचे नसेल तर त्याबाबतची तात्काळ कल्पना नोडल ऑफिसरला कळविण्यास सांगण्यात आले आहे.

कोविड रूग्ण आणि हेल्थ वर्कर यांच्यासाठी सुधारीत नियमावली खालीलप्रमाणे:-

 

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *