Breaking News

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सी म्हणाले, रोज लढतोय… आणि प्रकाशाचा अंधारावर विजय होईल भाषणाने युरोपियन युनियन झाली मंत्रमुग्ध, मिनिटभर टाळ्यांचा कडकडाट

मागील सहा दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर रोज लष्करी हल्ले होत आहेत. तरीही युक्रेनकडून रशियाच्या हल्ल्यांना तोंड देत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतिहल्ले आणि स्वत:चे संरक्षण करत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांच्या दबावामुळे रशिया एकाबाजूला चर्चेच्या टेबलवर जरी आलेली असली तरी ती दुसऱ्याबाजूला हल्ले कायम ठेवलेले आहेत. यापार्श्वभूमीवर आज युरोपियन युनियनची आपद्कालीन बैठक बोलाविण्यात आली. तसेच युक्रेनच्या अध्यक्षांकडून युनियनच्या सदस्यत्वासाठी त्यांनी अर्ज केला आणि आपले व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून युनियनसमोर मनोगत व्यक्त केले. त्या मनोगताचा सारांश खालील प्रमाणे…

वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यावेळी आवेशपूर्ण भाषण केले. या भाषणाने युरोपियन संसदेतल्या सगळ्यांनाच प्रभावित केले. आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरं बंद झाली आहेत. पण तरी देखील कुणीही आम्हाला तोडू शकत नाही. आम्ही सक्षम आहोत. आम्ही युक्रेनचे नागरिक आहोत. आमच्या मुलांना जिवंत ठेवण्याची आमची इच्छा आहे. माझ्या मते ही अगदीच रास्त इच्छा आहे. काल इथे १६ मुले मारली गेली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन वारंवार हेच सांगत आहेत की ते एक प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत ज्यात फक्त लष्कराची ठाणीच टार्गेट केली जात आहेत. पण तिथे मुले होती. ते नेमकी कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत? कोणते टॅंक ते घेऊन जात आहेत. मिसाईल्स डागत आहेत. त्यांनी काल १६ मुलांना मारले. आमचा निर्धार पक्का आहे. आमचं मनोधैर्य प्रचंड उंचावलेलं आहे. आम्ही लढत आहोत. आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी. आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत.

आम्ही जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटे पडेल. आम्ही आमचे सामर्थ्य सिद्ध केलं आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केलं आहे की तुमच्याप्रमाणेच आम्ही देखील या जगाचे समान सदस्य आहोत. त्यामुळे हे सिद्ध करा की तुम्हीदेखील आमच्यासोबत आहात. हे सिद्ध करा की तुम्ही आम्हाला एकटं सोडणार नाहीत. हे सिद्ध करा की तुम्ही खरंच युरोपियन आहात. मग जीवन हे मृत्यूसमोर विजयी होईल. प्रकाशाचा अंधारावर विजय होईल.

झेलेन्स्की यांचे भाषण संपताच युरोपियन युनियनचे सर्व सदस्य उठून उभे राहिले आणि पुढे मिनिटभर सदस्यांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. शेवटी जेव्हा झेलेन्स्की यांनी स्वत:हून संसदेचा निरोप घेतला आणि ते स्क्रीनमधून बाहेर पडले, तेव्हा कुठे हा कडकडाट कमी होत थांबला.

Check Also

सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची मागणी, नेताजींच्या यांच्या अस्थी भारतात आणा जपान मध्ये असलेल्या अस्थी भारतात आणून गंगेत विसर्जन करा

आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published.