Breaking News

लोकप्रिय फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे निधन वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आंतरराष्ट्रीयस्तरावरील लोकप्रिय फिरकी गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न यांच्या व्यवस्थापनाने शनिवारी याबाबत माहिती दिली.
कोह सामुई, थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा मृत्यू झाला. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही शेन वॉर्नला वाचवण्यात अपयश आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.
जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे भूमिका त्याने व्यक्त केली होती.

शेन वॉर्नने आतापर्यत कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जातो. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती. मधल्या काळात त्यांनी भारतासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शेन व़ॉर्नच्या निधनाने आंतरराष्ट्रीयस्तरावरील लोकप्रिय गोलंदाज गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
शेन वॉर्न जरी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून खेळत असला तरी त्याच्या फिरकी गोलंदाजाचे अनेक फॅन होते. तसेच त्याच्या क्रिकेटमधील अतुलनीय खेळामुळे त्याचे चाहते प्रत्येक देशात निर्माण झाले.

Check Also

सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणाले, धनुष्यबाण विषयीचा निर्णय आम्ही घेऊ उध्दव ठाकरेंना दिलासा; निवडणूक आयोगाला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी …

Leave a Reply

Your email address will not be published.