Breaking News

१ ल्याच दिवशी दुर्घटना: वैष्णोदेवी चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी आणि वारसांना मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून शोक

मराठी ई-बातम्या टीम

जम्मू येथील जगप्रसिध्द देवस्थान असलेल्या वैष्णोमंदिरात पहाटे २.४५ वाजता झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची वृत्त कळत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा करत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतकांच्या वारसांना २ लाखाची मदत ही केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचलचे होते. त्यादरम्यान, चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतत आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.

सर्व जखमींवर या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली होती. मात्र काही काळानंतर पुन्हा दर्शनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला.

माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार तर १३ जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे २:४५ च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, काही जणांमध्ये वाद झाल्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.

तर दर्शनासाठी काहीजण गेलेल्या भाविकांनी सांगितले की, नववर्षानिमित्त लोकांची गर्दी होणार याचा अंदाज असूनही प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची गरज होती. परंतु तसे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून भाविकांना शिस्त लावण्याऐवजी पोलिसांनी लाठीचार्ज करत होते. तर दुसऱ्याएकाने सांगितले की, जाणारे आणि येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानेही दुर्घटना घडली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत माता वैष्णो देवी भवनात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. देव जखमींना लवकर बरे करो. मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत आणि मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तर वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५,००० रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

तसचे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी झालेल्या दुर्घटनेबद्दल संवेदना व्यक्त करत शोक दाखविला. तसेच जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटावे अशी आशा व्यक्त केली.

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *