Breaking News

राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार, शिवसेनेशी चेष्टा किती महाग पडलीय… चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ तास काम करतात आणि फक्त २ तास झोपतात असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वाक्याचा धागा पकडत चमच्यांची जागा कधी अंधभक्तांनी घेतली कळली नाही. त्यामुळे चमच्यांचे हाल होणार असा असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव घेता आज सकाळी लगावला. तसेच मोदींनी त्यांचे कारनामे ऐकले तर त्यांना मिळणारी २ तासाची झोपही येणार नाही असे सांगत टीका केली.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही, संजय राऊत माझी चेष्टा करतायत, त्यांना माहित नाही माझी केलेली चेष्टा त्यांना महागात पडणार आहे. मी सामना वाचणं आणि राऊतांवर बोलणं बंद केलेय असे सांगत राऊतांना गर्भित इशारा दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पलटवार करत एक ट्विट केले असून त्या ट्विट मध्ये राऊत म्हणाले,

नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? असा सवाल करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या बाबत जी भाषा तुम्ही वापरता. चेष्टा करता ते सहन करायचे ? असा खोचक टोला लगावत शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

आणि शरद पवारांनी सांगितला खातं बदलून घेण्याचा किस्सा अजित पवारांना झोप काही लागणार नाही

विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची …

Leave a Reply

Your email address will not be published.