Breaking News

लोकसभेत राहुल गांधी यांची मागणी, व्होटर लिस्टबाबत अनेक तक्रारी, चर्चा झाली पाहिजे विरोधक आक्रमक व्होटर लिस्टवरून अनेक प्रश्न

लोकसभेत शून्य प्रहराच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणाऱ्या व्होटर लिस्टवर चर्चेची मागणी केली. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणूकीच्या व्होटर लिस्टबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच व्होटर लिस्टच्या विश्वासर्हातेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे व्होटर लिस्टवर चर्चा करण्यात यावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

यावेळी लोकसभेत इंडिया आघाडीच्या आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही राहुल गांधी यांची मागणी उचलून धरत व्होटर लिस्टवर चर्चा झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्देशून पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. व्होटर लिस्ट ही काय सरकार बनवते का ? त्यावर ओम बिर्ला म्हणाले की, मी काही तसे बोललो नाही. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, मी व्होटर लिस्ट बाबतचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा आपण काय असा प्रतिप्रश्न केलात. तुम्ही बोललात ते बरोबर आहे. व्होटर लिस्टवरून सभागृहात चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत व्होटर लिस्टच्या ब्लॅक आणि व्हाईटवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच तेथील मतदार आणि व्होटर लिस्टमधील मतदारांच्या नावावरूनही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, व्होटर लिस्टच्या अनुषंगाने आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितली. मात्र ती अद्याप आम्हाला दिली नाही. त्याचबरोबर काही मुद्दे आम्ही उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भात तक्रार केली. मात्र त्याही निवडणऊक आयोगाने पूर्ण केल्या नाहीत असे सांगितले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, त्यामुळे व्होटर लिस्टच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळे या विषयावर लोकसभेत चर्चा व्हावी अशी मागणी केली. त्यावेळी सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनीही लोकसभेत चर्चेची मागणी अध्यक्षांकडे करत उचलून धरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *