Breaking News

सर्वाधिक काळ सत्तास्थानी राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीयला अखेरचा निरोप ५०० हून अधिक राजघराणी आणि देशाच्या प्रमुखांनी दिली अखेरची मानवंदना

अर्ध्याहून अधिक पृथ्वीतलावर राज्य करणाऱ्या आणि ब्रिटनच्या साम्राज्यवादाच्या सर्वोच्च काळापासून ते अस्तापर्यतचा काळ पाहणाऱ्या आणि इतिहासातील अनेक घटनांची साक्षीदार राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराला जगभरातील ५०० हून अधिक राजघराणी आणि राष्ट्रप्रमुखांनी अंत्ययात्रेत सहभागी होत अखेरची मानवंदना दिली.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर लंडनच्या वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये अत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधी कार्यक्रमाला जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात आले. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटनवर तब्बल ७० वर्ष राज्य केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे पुत्र चार्ल्स तिसरे हे ब्रिटनचे राजे झाले आहेत.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु अंत्यविधीसाठी लंडनमध्ये उपस्थित राहिल्या. त्यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते लंडनमध्ये दाखल झाले. महाराणीच्या अंत्यविधीसाठी ५०० राजघराण्यांचे सदस्य, राष्ट्रांचे प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले होते.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबरला स्कॉटलँडमध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आले होते. लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराणीच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी आठ किलोमीटरपर्यंत रांग लावली होती.

महाराणी एलिझाबेथ यांच्यावरील अंत्यसंस्कार जगभरातील ८ कोटी लोकांनी ऑनलाईन पध्दतीने पहात महाराणीला अखेरचा निरोप दिला.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *