Breaking News

निवडणूकीतील चमत्कारासाठी भाजपा झाली गुरूमीत राम रहिमवर मेहरबान १४४ दिवस पॅरोलखाली मंजूर

बेटी बचाव बेटी पढाओ चा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मात्र त्यांच्या या घोषणेचा परिणाम भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर किती झाला याची माहिती वेळोवेळी बाहेर आलेली आहे. मात्र हरियाणातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच आश्रमातील मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी २० वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमीत राम रहिम याने भाजपाच्या बाजूने चमत्कार घडवून आणावा यासाठी हरियाणातील खट्टर सरकारने राम रहिमची पॅरोलची मुदत संपण्याआधीच दुसऱ्यांदा पॅरोल मंजूर केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

हरियाणा सरकार गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर मेहरबान झाल्याचं चित्र आहे. मात्र हरियाणा सरकारने बाबा रहिमवर कृपा दृष्टी ठेवली आहे. त्यामुळेच या बाबा राम रहिमला १४ महिन्यांत १३३ दिवसांची पॅरोल मंजूर झाली आहे. २८ ऑगस्ट २०१७ ला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमीत राम रहिमला दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर १७ जानेवारी २०१९ ला पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

हरियाणा सरकारने गुरुमीत राम रहिमला गुरुग्रामच्या रूग्णालयात असलेल्या आजारी आईला भेटण्यासाठी १ महिन्याची पॅरोल २४ ऑक्टोबर २०२० ला मंजूर केली. त्यानंतर २१ मे २०२१ लाही पु्न्हा एकदा आजारी आईला भेटण्यासाठी एक महिन्याची पॅरोल मंजूर केली.
१८ ऑक्टोबर २०२१ ला न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर रंजीत सिंह याच्या हत्येच्या गुन्ह्यात राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ७ फेब्रुवारी २०२२ ला हरियाणा सरकारने या बलात्कारी बाबाची २१ दिवसांची पॅरोल मंजूर केली. जून २०२२ मध्ये या राम रहिमला पुन्हा एकदा एक महिन्याचा पॅरोल मंजूर करण्यात आला. ऑक्टोबर २०२२ मध्ये राम रहिमला ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यानंतर याच महिन्यात म्हणजेच २१ जानेवारी २०२३ ला बाबा राम रहिमला आणखी ४० दिवसांचा पॅरोल मंजूर कऱण्यात आला. डेरा प्रमुख शाह सतनाम यांच्या जयंतीसाठी हा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

मागच्या १४ महिन्यांचा हिशोब केला तर १४ महिन्यातले १३३ दिवस बाबा राम रहीम तुरुंगाबाहेर होता. कारण हरियाणा सरकारने त्याला पॅरोल मंजूर केली. राम रहिमने दोन बलात्कार आणि दोन हत्या केल्या आहेत. त्याला २० वर्षांची शिक्षा आणि दुहेरी जन्मठेप अशा शिक्षाही सुनावण्यात आल्या आहेत तरीही १४ महिन्यातले १३३ दिवस बाबा राम रहिम हा पॅरोलवर बाहेर असल्याचं समोर आलं आहे.

राम रहिमला गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. अशात त्याला वारंवार विविध क्षुल्लक कारणांसाठी पॅरोल का दिला जातो आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. रोहतक न्यायालयाने शनिवारी पॅरोल मंजूर केला. पॅरोल मंजूर होताच, तो थेट बागपत येथील त्याचा आश्रमात पोहोचला. यावेळी त्याने तलवारीने केक कापून पॅरोल मिळाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी त्याचे भक्तदेखील उपस्थित होते. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी गुरूमीत राम रहिम हा पॅरोलवर बाहेर आल्यापासून दररोज सत्संग आयोजित करत असून या सत्संगास भाजपाच्या खट्टर सरकारमधील अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारीही जाहिररित्या उपस्थित रहात असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे राम रहिमच्या चत्मकारासाठी भाजपा मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *