Breaking News

नाशिकच्या गोंधळावर प्रश्न विचारताच छगन भुजबळांनीही उगारला माईक, पण… कृतीतून शास्त्रार्थ सभेतील गोंधळावर लगावला टोला

हनुमानाच्या जन्मस्थानावरून सध्या नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या पहिल्याच दिवशी कर्नाटकच्या गोविदानंद महाराज आणि महंत सुधीरदास पुजारी यांच्यात खटका उडाला. त्यामुळे सुधीरदास पुजारी यांनी एका चॅनेलचा बूमचा गोविंदानंद महाराजांवर उगारल्याचे चित्र पहायला मिळाले.

या साऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांना एका पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला. त्यावर छगन भुजबळ यांनी समोर ठेवण्यात आलेल्या बूममधील एक बूम उचलून प्रश्नकर्त्या पत्रकाराला उत्तर देत म्हणाले की, मग काय शंका आहे का? हनुमानाचा जन्म नाशिकात झाला ते. असे सांगताच उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा उडाला. दरम्यान छगन भुजबळांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने आपली अनोखी कल्पकता दाखविल्यावरून भुजबळाने अप्रत्यक्ष शास्त्रार्थ सभेतील महंताना टोला लगावला.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही –

निवडणूक आयोग आपलं काम करत असल्याची कल्पना आहे. अजून निवडणूक आयोगाचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर एक ते दीड महिन्याची प्रक्रिया असून हा पावसाचा हंगाम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला पावसाळ्यात निवडणूका घेणे कठीण जाणार आहे अशी विनंती केली आहे. दुसरीकडे बांठिया आयोगही अतिशय चांगलं काम करत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सरकारच्यावतीने

मुख्य सचिव व इतरही मंडळी अभिप्रेत असलेला डाटा गावागावातून गोळा करत आहे. मध्यप्रदेशने जे गोळा केले तसेच त्यांनी करावं आणि अधिक चांगलं करता येईल ते करावं. पंधरा – वीस दिवसात आयोगाचं काम संपावं अशी अपेक्षा आहे. ते काम संपल्यावर आपल्यालासुध्दा सुप्रीम कोर्टाकडे आमचं आरक्षण मध्यप्रदेशचा जसा अहवाल आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार असल्याचे सांगत त्याच धर्तीवर परवानगी मिळायला अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आज जनता दरबार उपक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले असता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.
आता ज्या जनरल जागा सुटलेल्या त्या मान्य झाल्यानंतर त्यामध्ये ओबीसी आरक्षण येईल. स्री – पुरुष आरक्षण हे नेहमीच असते. पुरुषांचेही आरक्षण नेहमीच आहे. एसटी, एससी आरक्षण नेहमीचं आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षण असतेच. त्यामुळे तसंच हे आरक्षण होणार. त्यात अवघड काय आहे असा सवालही त्यांनी केला.

निवृत्त सचिव असतील किंवा मुख्य सचिव असतील त्यांच्यात विचारांचं घर्षण होत असतंच. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हवी ती माहिती देत आहोत. सरकार पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे चर्चा करणं म्हणजे फार मोठे मतभेद होणं असं नाही. चर्चा करत असतील. आमच्यात समन्वय आहे. ओबीसीचा डाटा हवा आहे बाकीचा कुणाचा डाटा आवश्यक नाही नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीवर ट्वीट केले आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी जीएसटीचा परतावा सगळाच द्या ना… तुम्हाला दोन महिन्याचा पगार दिला आणि दोन महिन्याचा पगार रखडला आणि एक महिन्याचा दिला तर दोन महिन्याचा पगार देणार नाही का? आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या. सगळा आमचा जो जीएसटी आहे जो हक्क आहे जो काही वीस – पंचवीस हजार कोटी रुपये गोळा करता तो आम्हाला देऊन टाका ठेवता कशाला असा रोखठोक सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला.

केंद्राने जीएसटी सोडून द्यावा आणि आम्हाला सांगावं की, जीएसटी संपली तुम्ही सेलटॅक्स गोळा करा मग प्रश्न येणार नाही तुमच्याकडे बोट दाखवण्याचा. सेलटॅक्स ऐवजी जीएसटी गोळा करता ते पैसे राज्याला मिळाले पाहिजे. राज्यासाठी गोळा होतात. ५० रुपयाचे पेट्रोल सव्वाशे रुपये करायचे आणि दहा रुपये कमी करायचे हा कुठला न्याय. सगळे कपडे काढून घ्यायचे आणि लंगोट द्यायची आणि म्हणायचं हे घ्या.. अरे पण आमचे बाकीचे कपडे द्या ना असा उपरोधिक टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

Check Also

“बुरा ना मानो होली है”, श्रीरामांनी वस्ताला केला प्रश्न, माझ्यामुळे तु की तुझ्यामुळे मी

एक आटपाट नगरी होती. सुदैवाने म्हणा किंवा योगायोग म्हणा श्रीरामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नावासारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *