Breaking News

आणि अजित पवारांच्या “त्या” वक्तव्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मुद्दा निकाली ? फडणवीसांवरील टीकेला उत्तर देताना अजित पवारांची स्पष्टोक्ती

मराठी ई-बातम्या टीम

मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकिय वर्तुळात सुरु असताना याविषयीचा उलघडा दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनीच केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाची सरळसरळ विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष असल्याची अवहेलनात्मक टीका करत शरद पवार यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची टीका केली. यासंदर्भात अजित पवार यांना पुण्यात विचारले असता ते म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला आमचे दिल्लीतील वरिष्ठ नेत्या तथा आमच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे उत्तर देतील असे स्पष्ट केले.

त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील भूमिका आणि त्याविषयीच्या टीका टिपण्णीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या उत्तर देतील आणि त्याबाबतची अधिकृत भूमिका ठरवतील असे अप्रत्यक्ष अजित पवारांनी सांगून टाकले.

तर राज्यातल्या प्रश्नाबाबत विचारा त्याचे सडेतोड उत्तर देतो असे सांगत बारामतीकरांनी मला एकदा दिल्लीला खासदार म्हणून पाठविले होते. नंतर शरद पवारांना दिल्लीला जावे लागल्याने मी महाराष्ट्रात परतलो ते गेली ३० वर्षे महाराष्ट्र सोडून कुठे गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या वक्तव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रतले नेतृत्व माझ्याकडे आहे आणि दिल्लीतील राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले. तसेच पक्षाच्या बाबत राज्यातील भूमिका आणि टीका टिपण्णीबाबत मीच साऱ्या गोष्टी ठरवित असल्याचे त्यांनी एकप्रकारे सूचित केले.

त्यामुळे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्वाधिकार आपल्याकडे असल्याचेही एकप्रकारे अजित पवार यांनी अप्रत्यक्ष सांगून टाकून पक्षांतर्गत नेतृत्वाची विभागणी झाल्याचेही त्यांनी अप्रत्यक्ष जाहीर करून टाकले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्वाचा मुद्दा एकप्रकारे निकाली काढल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. कदाचीत या नेतृत्वाच्या विभागणीमुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदार हे अजित पवारांना रिपोर्ट करतात तर खासदार हे सुप्रिया सुळे यांना रिपोर्ट करतात. तर काही महत्वाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे हा अजित पवारांच्या मदतीने राज्यात निर्णय घेताना दिसून येत आहे.

Check Also

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांच्या मंजूरीची प्रतीक्षा राज्यपालांच्या मंजूरीशिवायच निवडणूक होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने चालू हिवाळी अधिवेशनातच घेण्याचा चंग महाविकास आघाडीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *