Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या विनंतीला केंद्राने पुसली पाने मुंबई-हैद्राबाद हायस्पीड रेल्वे औरंगाबाद नव्हे तर पुणे मार्गे

मराठी ई-बातम्या टीम
मुंबईला हैद्राबादशी जोडणाऱ्या प्रकल्पात मराठवाड्याचा समावेश करावा अशी जाहिर मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सप्टेंबर महिन्यात जाहिररित्या करत तशा विषयीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहित विनंती केली. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या पत्राला केद्र सरकारने चक्का बाजूला ठेवत त्यांच्या विनंतीला पाने पुसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
केद्र सरकारकडून अहमदाबाद मुंबई हा बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर मुंबई-हैद्राबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यासाठी मुंबई, नाशिक, व्हाया पुणे मार्गे पुढे सोलापूर, गुलबर्गा आणि हैद्राबाद हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा मार्ग पश्चिम महाराष्ट्रातून जाण्याऐवजी तो औरंगाबाद मार्गे पुढे जालना मार्गे आणि नांदेड मार्गे नेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांची ही मागणी केंद्राने फेटाळल्याचे नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
१७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादसह मराठवाड्यातील शहरे मुंबईला जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली होती. तसेच त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून या प्रकल्पासाठी राज्य सरकार सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
तसेच याविषयीचे विनंती पत्रही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्रही लिहिले होते. त्यामुळे मराठवाड्याला मुंबईला बुलेट ट्रेनने जोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वाटत असतानाच केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला वाटण्याच्या अक्षता लावत हैद्राबादला मुंबईला पुणे मार्गेच जोडण्याचा पर्याय तसाच कायम ठेवला. त्यामुळे आता मराठवाड्याला फक्त मुंबई- नागपूर हा एकमेव बुलेट ट्रेनचा पर्याय उपलब्ध आहे.
परंतु मुंबई-नागपूर या बुलेट ट्रेनची घोषणाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर केली. परंतु त्यावरही अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे या बुलेट ट्रेन मार्गाने तरी मराठवाडा जोडला जाणार नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

Check Also

नववर्ष स्वागताचे नियोजन करताय? मग गृह विभागाची नियमावली वाचाच ३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 मराठी ई-बातम्या टीम कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *