Breaking News

६४ पक्षांच्या जखमी आणि मृत्यूनंतर अखेर नायलॉन मांजावर बंदी दहा फेब्रुवारीपर्यंत पतंग उत्सवात नायलॉन मांजाला पोलिसांनी केले बॅन

१४ आणि १५ जानेवारी रोजीच्या मकर संक्रांतीचे औचित्य साधत अनेक राजकिय नेत्यांसह सर्वसामान्य नागरीकांना पतंग उडविण्याचा आनंद लुटला. मात्र या पतंग उडविण्याचा आनंद लुटताना नायलॉन मांजाचा वापर केला. या नायलॉन मांजामुळे मुंबईत जवळपास ६४ पक्षांना जखमी आणि म़ृत व्हावे. या घटनांचे अनेक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिस आयुक्तालयाने १० फेब्रुवारी पर्यंत या मांज्यावर बंदी घातल्याचे आज दुपारी जाहिर केले.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहे.

दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवात प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना व पक्ष्यांना दुखापत होत असल्याचे आढळून आले आहे व अशा जखमा अनेकदा प्राणघातक ठरतात, त्यामुळे नायलॉन किंवा प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांपासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या नायलॉन मांजाच्या जीवघेण्या परिणामांपासून माणसांचे आणि पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.

हा आदेश १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड प्रक्रिया संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये दंडनीय राहणार आहे, असे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी काढले आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *