Breaking News

अधिकाऱ्याने केली भाजपाची पोलखोल…शहिदांना हसत श्रध्दांजली देतानाचा फोटो व्हायरल उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार विनय कटीयार यांचा तो फोटो केला ट्विट

मराठी ई-बातम्या टीम

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ११ जणांचा तामीळनाडू येथील निलगीरी पर्वतरांगामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असताना उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार विनय कटीयार यांनी हसत दुर्घटनेतील शहिदांना श्रध्दांजली वाहत असतानाचा फोटो व्हायरल झाला. यावरून माजी आयएएस अधिकारी सुर्य प्रताप सिंह यांनी भाजपाची चांगलीच पोलखोल करत टीका केली.

ट्विट करत ते म्हणाले, काल नशेडी पत्रकाराची सभा ऐकली आता भाजपाची हसून श्रध्दांजली वाहतानाचा फोटो पहा अशा उपरोधिक टीका त्यांनी केली.

कानपूरमधील भाजपा आमदार विनोद कटियार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात ते शहिदांना श्रद्धांजली वाहताना हसत असल्याचं दिसत आहे. त्यावरून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. आयएएस सूर्यप्रताप सिंह यांनी भाजपा आमदाराचा फोटो ट्वीट करत म्हणाले, काल नशेत असलेल्या पत्रकाराची श्रद्धांजली सभा पाहिली. आज कानपूरचे भाजपा आमदार विनोद कटियार यांची हसत-हसत श्रद्धांजली पाहा. त्यांनी केलेल्या या ट्विट्चे ४ हजार लोकांनी रिट्विट केले आहे तर १५ हजाराहून अधिक लोकांनी त्या ट्विटला लाईक केले आहे. तसेच जवळपास ३०० हून अधिक जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

नववर्ष स्वागताचे नियोजन करताय? मग गृह विभागाची नियमावली वाचाच ३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 मराठी ई-बातम्या टीम कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *