Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे मुळ गावाजवळ नवा हायटेक ब्रीज कुंभरोषी कलमगांव तापोळा ते अहिर गाव रोड, टी अॅण्ड टी कंपनी कंत्राटदार

मागील साडेसात वर्षापासून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती सांभाळणारे आणि आता मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी ते वांद्रे या सी लिंकची प्रतिकृती असलेला पूल उभारण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे हा पूल मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुळगावी असलेल्या ठिकाणाहून जवळच उभारण्यात येणार आहे. तसेच हा पूल पर्यटनाच्यादृष्टीनेही अत्याधुनिक पध्दतीने उभारण्यात येणार आहे. या पूलाची माहिती देणारा व्हिडीओ नुकताच जारी करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरणाच्या बँक वॉटरवर हा पूल उभारण्यात येणार आहे. हा हायटेक पूल कुंभरोषी कलमगांवापासून तापोळा ते अहिरे गावं या दरम्यान हा पूल उभारण्यात येणार आहे. या पूल उभारणीच्या कामसाठी राज्य सरकारकडून १७५ कोटी रूपये रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर याचे काम सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणार आहे. तर या कामाचे कंत्राट टी अॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे. मुंबईच्या बाहेर स्टे केबल असलेला हा पहिलाच पूल ठरणार आहे.

या पूलाची उंची१४ मीटर इतकी असणार आहे. तर पूल ५४० मी लांबीचा आणि १४ मीटर रूंदी राहणार आहे. या पुलावर ३५ मीटर आणि ४५ मीटर उंच असे दोन गाळे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय या भागात पर्यटकांसाठी नवे निसर्ग सौदर्य पाहता यावे यासाठी पुलाच्या बरोबर मध्यभागी एक टॉवर उभारण्यात येणार असून या टॉवरवरून आजूबाजूला असलेला पूर्ण कोयना डॅमच्या मागील बाजूचा भाग पाहता येणार आहे. याशिवाय या भागातील वनसंपदाही पाहता येणार आहे.

राज्याच्या मुख्यंत्री विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे फक्त कामातून आलेला शिनवटा घालविण्यासाठी आपल्या मुळ गावी जात असल्याचे मुड फ्रेश झाल्यानंतर पुन्हा कामात सक्रिय होत असल्याची माहिती त्यांनी दस्तुररखुद्द स्वत: विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आभार प्रदर्शन करताना केलेल्या भाषणात सांगितली होती. त्यामुळे ठाण्यातील विकास कामांबरोबरच मुळ गांव असलेल्या भागातही विकास कामे करण्याचा त्यांचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री पदावर असे पर्यत या पूलाचे काम पूर्ण करून त्याचे उद्घाटनही करण्याचा एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रस्तावित पुलाची ही क्षणचित्रे:-

 

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *