Breaking News

भाजपाच्या पक्षांतर्गत कायद्यातील ही तरतूद तुम्हाला माहित आहे का? थरूर यांचे ट्विट राज्य घटनेवर विश्वास आणि पालन करण्याची पक्षाच्या कायद्यात तरतूद

मागील आठ वर्षापासून देशात आणि काही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच भाजपाशी संबधित अनेक संघटनांकडून नेहमीच हिंदू आणि हिंदूत्ववादी विचारणीवर भाष्य केले जाते. तसेच मुस्लिम समुदायाच्या विरोधात प्रक्षोभक भाषाही वापरली जाते. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्याच्या निवडणूकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्या अनुषंगाने बरीच सूचक विधाने केली. त्यावरून काही प्रमाणात गदारोळही उठला. पण भारतीय पक्षाची घटना मात्र प्रत्यक्षात वेगळीच असल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली असून ही बाब काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर यांनी उघडकीस आणली.

तसेच भाजपा ४२ वर्षाचा झालेला असून आता तरी तुमच्याच पक्षाच्या घटनेनुसार काम कधी करणार असा सवाल करत त्या पहिल्या पानात फारसं काही नाही पण परंतु तुम्ही प्रत्यक्ष किंवा त्या गोष्टीवर विश्वास ठेवता, की हा ही तुमचा जुमला आहे असा खोचक सवालही भाजपाला केला.

भारतीय जनता पक्षाची स्थापना करताना या पक्षाने आपली घटना असते, जशी काँग्रेस पक्षाची आणि अन्य राजकिय पक्षांची राजकिय घटना आहे. तशीच ही घटना तयार करण्यात आली आहे. पक्षाची घटना तयार करताना भाजपाने आपल्या घटनेच्या पहिल्या पानावर उद्देशिका नमूद केले आहे की, “भारतीय जनता पार्टी ही भारताला एक सशक्त आणि आशादायी देश म्हणून उभारणीसाठी आधुनिक, प्रागतिक आणि प्रकाशमान अशा देशाच्या निर्मितीसाठी भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि तत्वांपासून प्रेरणा घेवून काम करेल. तसेच जागतिकस्तरावर आणि सीमावर्ती भागात शांतता स्थापित करण्याचे उद्दीष्ट आहे.”

त्यासाठी भाजपाचे उद्दिष्ट हे जात-धर्म, वंश आणि लिंग भेद नसलेले, राजकिय, सामाजिक, आर्थिक न्याय, समानता, समान संधी, धार्मिक आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असलेले लोकशाहीवादी देशाच्या स्थापनेचे आहे.

“भारतीय राज्यघटनेद्वारे स्थापित झालेल्या कायद्याचे, समाजवादाच्या तत्वांचे, धर्मनिरपेक्षतावादाचे, लोकशाहीचे आणि देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि बंधुतेवर भाजपाचा पूर्ण विश्वास राहील.” असेही त्या उद्देशात नमूद करण्यात आले आहे.

त्याचबरोबर पक्षाचे साधे तत्वज्ञान- अंतर्गत मानवतावादी दृष्टीकोन हा पक्षाचे मुळ तत्वज्ञान राहील.

पक्षाची कमिटमेंट:-“भाजपा हा राष्टीयत्व आणि राष्ट्रीय एकता, लोकशाही, सामाजिक-आर्थिक प्रश्नांकडे गांधीवादी दृष्टीकोनातून पाहिल आणि शोषणमुक्त समाज स्थापन करण्यास कटीबध्द आहे. याशिवाय सकारात्मक धर्मनिरपेक्षता अर्थात सर्व धर्मसमभाव आणि गुणात्मक राजकारण करण्यासही कटीबध्द असून आर्थिक आणि राजकिय सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या बाजूने भाजपा नेहमी उभा राहील.”

Check Also

आणि शरद पवारांनी सांगितला खातं बदलून घेण्याचा किस्सा अजित पवारांना झोप काही लागणार नाही

विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची …

Leave a Reply

Your email address will not be published.