Breaking News

उच्च न्यायालय म्हणाले, उमर खालीदचे “ते” वक्तव्य दहशतवादी कृत्य ठरत नाही ते वक्तव्य जरी आवडले नसले किंवा वाईट वाटणारे असले तरी

मागील वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये जेएनयुचा विद्यार्थी तथा कार्यकर्ता उमर खालीद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दहशतवादी कृत्यात मोडणारे असल्याचा आरोप ठेवून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला. मात्र उमर खालीद याचे वक्तव्य जरी न आवडणारे, वाईट वाटणारे अशा पध्दतीत मोडत असले तरी त्या वक्तव्याने खालीद हा दहशतवादी असल्याचे ठरत नाही असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले.

अमरावतीतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे वक्तव्य केले होते. तसेच इनक्लाब आणि क्रांती हे शब्द वापरले होते. त्यामुळे खालीद याचे वक्तव्य हे दहशतवादी कृत्य असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी युएपीए कायद्याखाली गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे ट्रायल न्यायालयाने उमर खालीद याच्यावर युएपीए कायद्याखाली करण्यात आलेली कारवाई बरोबर असल्याचा निकाल देत जामीन देण्यास नकार दिला. त्याविरोधात उमर खालीद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायमुर्ती सिध्दार्थ मृदल आणि राजनीश भटनागर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने वरील मत नोंदविले.

यावेळी न्यायालयाने उमर खालीदची आणि पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालय म्हणाले की, खालीद याचे भाषण फारच वाईट पध्दतीचे असेल तरी ते दहशतवादी कृत्यात मोडत नाही. आम्ही समजू शकतो. जर त्यावरील युक्तीवादात ते भाषण फारच ऑफेसिव्ह असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यास कायद्यात बसविता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यास एक संधी देत आहोत असे न्यायाधीश मृदल यांनी सांगितले.

ते भाषण जरी न आवडणारे असले तरी त्यासाठी फार तर अवमानकारक गुन्हा किंवा इतर गुन्हा नोंदविता येईल. परंतु ते भाषण दहशतवादी कृत्यात येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उमर खालीद याची बाजू त्रिदीप पै यांनी मांडली. बाजू मांडताना पै म्हणाले की, सिएरा, स्मित, इको, डेल्टा आणि गामा यापैकी कोणालाही सीलमपूर येथे बोलाविण्यात आले नव्हते. तसेच या सर्वांची कोणतीही गुप्त बैठक नव्हती हे त्यांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. तरीही अशा पध्दतीचे आरोप लावण्यात आले आहे. त्यास विरोध असल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

त्याचबरोबर या प्रकरणातील नताशा नरवाल यांना सह आरोपी करण्यात आले आहे. मात्र त्या ही त्यावेळी हजर नव्हत्या.

त्याचबरोबर स्मित, सिएरा या दोघांचे जबाब पाहिले तर या दोघांचे जबाब आणि त्यातील शब्दप्रयोग एकसारखेच वाटतात. उमेर खालीद यास अटक करण्याच्या तीन दिवस आधीच स्मित याचा जबाब नोंदविण्यात आला होता. तो एकमेव साक्षीदार आहे ज्याच्याशी शस्त्रास्त्र जमाविल्यासंदर्भात मी चर्चा केल्याचा जबाब नोंदविण्यात आला. पण खालीद यास कडून कोणतेही शस्त्रात मिळाले नाहीत अशी माहितीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *