Breaking News

वावड्यांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी अखेर विरोधकांना दाखवून दिलेच जवळपास तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच समाजमाध्यमातून फिट अन् फाईन असल्याचे दिले दाखवून

मराठी ई-बातम्या टीम

मागील दोन-तीन महिन्यापासून मानेवरील शस्त्रक्रियेमुळे अदृश्य झालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमातून आपले दृश्यात्मक दिसत आपण फिट अॅण्ड फाईन असल्याचे दाखवून देत निवडणूकीपूर्वी अनेकजण आश्वासन देतात मात्र निवडणूकीनंतर विसरतात असे. मात्र शिवसेना आश्वासन देणारी नसून वचन पूर्ती करणारे असल्याचा इशारा विरोधकांना देत राज्याचा मुख्यमंत्री आपणच आहे आणि पुढेही असू असे खणखणीत उत्तर दिले.

आपल्या आजारपणामुळे मागील काही महिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रत्यक्ष कोणत्याही बैठकांमध्ये किंवा समाज माध्यमातून कामकाज करत असल्याचे राज्यातील जनतेने पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरून विरोधकांनी राज्यात मुख्यमंत्री बदलाची मागणी करत हवे तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा आदित्यवर विश्वास नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशा मागण्या केल्या होत्या.

त्याचबरोबर मुख्यमंत्री बदलला जाणार, मुख्यमंत्र्यांशिवाय किती दिवस राज्यशकट हाकला जाणार यासह अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांच्या प्रकृतीवरून नको त्या वावड्या उठविल्या जात होत्या.

परंतु, आज पहिल्यांदाच मुंबईकरांना नवं वर्षाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या आयोजित बैठकीचे थेट प्रसारण ट्विटरवरून आणि फेसबुक या समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेसाठी करण्यात आले. त्या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सीताराम कुंटे, मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, नगरविकास विभागाचे सचिव डॉ.महेश पाठक यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आपले मत मांडल्यानंतर नगरविकास विभागाचे सचिव डॉ.पाठक यांनीही आपले मत मांडले. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम निर्णय जाहीर केला.

या बैठकीत ज्या कारणासाठी मुख्यमंत्री उपचारासाठी सुट्टीवर होते. त्याचा साधा लवलेशही आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता. तसेच पूर्वीच्या तडफेनेच त्यांनी सर्व गोष्टींचा आढावा घेत विरोधकांवर निशाणाही साधला. त्याचबरोबर वाढत्या कोरोना-ओमायक्रॉनपासून नागरीकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यास ते विसरले नाहीत.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *