Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, फक्त एकदा समोर येवून सांगा…; वाचा नेमके काय म्हणाले दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तर मला आनंदच लगेच खुर्ची सोडतो

मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील दुसऱ्या नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून आणि शिवसेनेकडून हे बंड संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही केल्या बंड संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसेनात. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीने शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद झाला.

माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. बोलण्यासारख बरेच आहे. पण मी आता कोविड बद्दल बोलायला आलो नाही. आज मी वेगळ्याच विषयावर बोलायलो आलो आहे. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही अश्या परिस्थितीत माझ्या सारख्या प्रशासनाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या हाती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. मला सगळ्यांनी सहकार्य केले. विशेषतः मला प्रशासनाने भरपूर सांभाळून घेतले. मला जे करायचे होते ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे नाव आले.

मागील काही दिवसांपासून माध्यमात अनेक अफवा किंवा संख्याबळाचे गणित याबद्दलची माहिती येत आहे. मी भेटत नव्हतो हे काही दिवस शक्य नव्हते. मागील दोन तीन महिने फारच त्रासात गेले कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट मिटींग रूग्णालयात केली. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदूत्वासाठी कोणी काय केले काय नाही याबाबत बोलणार नाही. पण महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे.

ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्यात आली. २०१२ साली बाळासाहेब गेले. त्यावेळी आपण एकट्याने निवडणूकीला सामोरे गेलो. त्यावेळी २०१४ साली एकट्याच्या ताकदीवर ६३ शिवसेनेचे आमदार निवडून आले. तेही हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते बाळासाहेबांच्यानंतरच्या शिवसेनेनेच आपणाला दिले.

हे आमदार गायब ते आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा विधान परिषदेची निवडणुक झाली. हॉटेल मध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम पूर्ण करणारा आहे. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. मला बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण करायचे होते. त्यामुळे २०१९ मध्ये सोनिया गांधी, शरद पवार यांच्यात बैठक झाली. बैठकीत सगळं ठरलं. त्यानंतर विशेषतः पवार साहेबांनी मला बाजूच्या खोलीत नेले आणि सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पुढे चालणार नाही. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली. नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. पण कधी कुठले वळण घ्याचे हे ही महत्वाचे आहे.

धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा फोन आला होता. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहित नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार आहे. आजच मी वर्षावरून मुक्काम हलवतोय. मी मुख्यमंत्री पदी नकोय तर हे समोर येऊन बोला.

कुऱ्हाडीची गोष्ट तुम्हाला माहितच असेल कुऱ्याडीचा दांडा गोतास काळ. ती झाडंही बोलत असतील. मात्र एकदा एका चिमणीने झाडाशी बोलताना विचारले की तु दुःखी का? ज्याने घाव घातल्या जाताहेत ते लाकूड झाडाचेच आहेत. त्यामुळे मला वेदना अधिक होत आहेत. शिवसेनेचेच लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी असून मी पद आताच सोडायला तयार आहे.

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय तर फोन करा आणि हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पदं नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कोविड काळात मी जेव्हाही ऑनलाईन पध्दतीने संवाद साधला त्यावेळी अनेकांनी कुटुंब प्रमुख असल्याचे वाटता म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण आहे. संख्या कशी जमवता हे नगण्य. त्यामुळे अविश्वासदर्शक ठराव आणून माझ्या विरोधात संख्याबळ जास्त असल्याचे दाखविण्यापेक्षा मी आपला मानतो त्यांनी मला समोर येवून सांगाव मी मुख्यमंत्री पदावर नको म्हणून पद सोडतो. यानंतर मी रस्त्याने जाताना आपली भेट होईलच फक्त एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *