Breaking News

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीला अखेरचा निरोप, मुलीने दिला मुखाग्नी लष्करी इतमामात १७ फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार

मराठी ई-बातम्या टीम
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असलेले बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी ल्ष्कराकडून त्यांना १७ फैरींची सलामी दिली. रावत यांची मुलगी कृतिका आणि तरीणी या दोन मुलींनी रावत पती-पत्नीला मुखाग्नी दिला.
तामीळनाडूतील नीलगीरी पर्वत रांगेत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ११ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयावह होता की या दोघांची ओळख पटविण्यासाठी लष्कराला बरेच प्रयत्न करावे लागले.
काल संध्याकाळी त्यांचा मृतदेह पालम विमानतळावर ठेवण्यात आल्यानंतर आज सकाळी रावत रहात असलेल्या त्यांच्या घरी नेण्यात आला. पालन विमानतळावर त्यांच्यासह इतर मृत लष्करी अधिकाऱ्यांचा मृतदेह आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या राहत्या घरून लष्करी शिष्टाचारात त्यांची अंत्ययात्रा ब्रार स्क्वेअर येथे नेण्यात आली. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रावत पती-पत्नीवर त्यांच्या दोन्ही मुलींनी अंत्यसंस्कार केले.
रावत यांच्या अंत्यसंस्काराला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री डि.एस.धामी, यांच्यासह तिन्ही लष्कराचे प्रमुखांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
तसेच बांग्लादेश, श्रीलंका, नेपाल, भूतानल या देशांचे लष्करी कंमाडरही यावेळी उपस्थित होते. तर अमेरिका, लंडन, चीन, फ्रांस, जपान, इस्त्रायल आदी देशांनी रावत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रध्दांजली वाहणारे संदेश पाठविले.

Check Also

विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता

मराठी ई-बातम्या टीम अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा आमदार नितेश राणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *