Breaking News

अखेर उमर खालीद, खालीद सैफीसह पाच जणांना न्यायालयाने सोडले

२०२० साली ईशान्य दिल्लीतील दंगलप्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालीद, खालीद सैफी यांच्यासह पाच जणांची न्यायालयाने सुटका केली.

उमर खालीद हा विद्यार्थी नेता असून जेएनयु येथे कन्हैयाकुमार आणि उमर खालीद यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर उमर खालीदच्या विरोधात सातत्याने भाजपाशासित राज्यांमध्ये गुन्हे नोंदविले जात होते.

यापार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीतील दंगलप्रकरणी खजुरी खास पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिल्ली न्यायालयाने सुटका केली. उमर खालीद, खालिद सैफी याच्यासह तारीख मोईन रिझवी, जगर खान, मोहम्मद ईलियास याचीही मुक्तता केली.
दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश पुलस्तया प्रमचला यांनी वरील निर्णय दिला.

दरम्यान दिल्ली न्यायालयाने यांच्या सुटकेचे निर्देश देताना भारतीय गुन्हे कायद्यातील ४३७-१ खाली सुटकेचे निर्देश देताना १० हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे.

मात्र न्यायालयाने या दंगलप्रकरणी ताहीर हुसैन, लियाकत अली, रियासत अली, शाह आलम, मोह.शादाब, मोह.अबीद, रशीद सैफी, गुलफाम, अर्शद कय्युम, इर्शाद अहमद आणि मोह.रिहान यांच्यावर भारतीय दंडसंहिता खाली १२० बी, १४७, १४८, १८८, १५३-ए, ३२३, ३९५,४३५, ४३६, ४५४ आदी खाली आरोप निश्चित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

या सर्वांवर दंगल घडविण्याचा कट रचणे आणि दंगल प्रत्यक्ष घडवून आणणे या कारणास्तव या सर्वांवर युएपीए कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र आता तपास पूर्ण होऊन चार्जशीटही दाखल करण्यात आल्याने त्यांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे मत न्यायालयाने उमर खालीदसह पाच जणांना सोडताना मांडले. त्यामुळे आता उमर खालीदसह पाच जणांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *