कोरोनाचा प्रादुर्भावामुळे काळवंडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारूशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे, अॅड. उज्वल निकम, अभिनेता आणि अॅड गुरू भरत दाभोळकर, आरती अंकलीकर, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, रामदास पाध्ये, डॉ. समीरा गुजर, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूर यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ आनंद नाडकर्णी, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता उमेश कामत, प्रदीप वेलणकर आदी उपस्थित होते. हा प्रकाशन समारंभ शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी राष्ट्रीय पारितोषिक विजेती सावनी रवींद्र यांचं स्वरमयी संगीतिक अभिवादन सादर झाले. तसेच लेखिका चारुशीला निरगुडकर यांची मुलाखत डॉ समीरा गुजर यांनी घेतली. या पुस्तकातील काही भाग अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत यांनी अभिवाचन करत सादर केला. त्यानंतर मंदार, मंजिरी आणि प्रतिभा निरगुडकर यांनी लीला ताईंच्या आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ सुधीर निरगुडकर यांनी केले.
