Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कालची- आजची, आणि निष्ठा ? आंबेडकर वाद्यांनी पुन्हा अंतमुर्ख होण्याची गरज

दरवर्षीचा माहे जानेवारीपासून ते माहे एप्रिल अखेर पर्यंतचा कालावधी हा राष्ट्रीय पुरोगामी विचारवंताच्या जयंतीचा आहे. या काळात कट्टर आंबेडकरवादी म्हणून घेणारे राष्ट्रीय अध्यक्ष ते गल्ली बोळातील कार्यकर्त्यापर्यंतचे सर्वजण अगदी उत्साहाने आघाडीवर सहभागी झालेले असतात आणि हे सालाबाद प्रमाणे यंदाही आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो एखाद्या मोठ्या वाहनावर ठेवून मोठा दहा वीस बेसचा डी.जे.कर्कश्श प्रचंड अवाजात आणि त्यावर ओंगळवान्या गाण्याच्या तालावर मद्यधुंद किळसवाणा नाच्यासारखा नाच करणे असे एकंदरीत स्वरूप जयंतीचे आहे. मग हे बरोबर आहे का ? सम्राट अशोकाच्या स्वप्नातला भारत घडविण्याचे स्वप्न पाहिलेल्या विचारवंताचीच जयंती असते का ? वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी चौदा एप्रिल सोडली तर तीनशे चौसष्ट दिवसाचे काय हा प्रश्न ह्या कट्टर आंबेडकरवादी म्हणून घेणारी राष्ट्रीय अध्यक्ष ते गल्ली बोळातील कार्यकर्ते अश्या तथाकथित लोकांनी कधी स्वतःला विचारला आहे का? तर याचे उत्तर आपणास नकारात्मकच मिळेल हे निश्चित आहे.

मी लहान होतो. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा प्रचंड मोठा प्रभाव, आणि जरब व वचक देशातील प्रशासन व समाज व्यवस्थेवर होती. ही छाप चांगली सन १९५६ ते १९९५ पर्यंत होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याने प्रभावित झालेला, समाजात मोठा वर्ग अस्तित्वात होता. त्यात आरक्षणामुळे शासकीय व निमशासकीय नोकरीस लागलेला मोठा वर्ग होता. त्यात शाररीक शिक्षणाचे (पी.टी ) चे शिक्षक ही बहुसंख्य होते. हे (पी.टी ) चे शिक्षक आम्हा तरूण मुलांना आणि मुलींना लेझीम खेळणे, लाठी, काठी दांडपट्टा, तलवार बाजी, चक्री फिरवणे, तोंडातून आगीचा लोळ काढणे,
तलवारीने सोबतच्या खेळाडूच्या छातीवर, डोक्यावर, नरड्यावर आणि पोटावर लिंबू, केळी, कलिंगड, टरबूज कापने वरील प्रमाणेच शरीराच्या उल्लेख केलेल्या अंगावर काठीने व फर्शी कु-हाडीने नारळ फोडणे असे अव्वल मैदानी खेळ खेळण्याचे मार्गदर्शन करीत असत आणि अश्या तरबेज मुलांचा संघ तयार करीत होते. मग हे संघ सामन्यात उतरले तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे, कितीही नावाजलेला कोणताही संघ आमच्यासमोर टिकत नसत. त्या वेळेस आम्हा सर्व तरूणांना मैदानी खेळाचे फार मोठे आकर्षण होते. फार महत्वाची मोठी गोष्ट म्हणजे त्या वेळचा तरूण वर्ग हा व्यसनापासून फारच लांब होता. याचे एकमेव कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अयुष्यात साधे सुपारीचे खांड खाल्ले नाही. ही गोष्ट त्यांच्या समकालीन लोकांकडून आम्हाला सतत सांगितली जायची.

आमच्यात शक्तिप्रदर्शनाच्या चढाओढी लागत असत. एखाद्याने पाचशे जोर बैठक मारले तर दुसरा हजार जोर बैठका मारून दाखवत असत. त्यामुळेच आमची शरीरयष्टी ही पिळदार होती. त्यात आमच्या मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक करणा-या प्रत्येक संघाचे ड्रेस कोड सुधा आकर्षक असत, त्यामुळेच आम्हा खेळाडूच्या बलदंड शरीराचे प्रदर्शन होत असे.

त्यातील खास आकर्षण म्हणजे आमचा मल्लखांब संघ हा होय. ते सर्व खेळाडू तर लगोटबंद असत एकापेक्षा एक अशी सर्रस प्रात्यक्षिक सादर करीत असत. हे खेळ शहराच्या मुख्य रस्त्यावरून जागोजाग तासंन तास सदर केले जात होते. आंबेडकर वादी समाज सोडून इतरांची बघ्याची बायापोरांची लांबसडक गर्दी रस्त्याच्या दुतर्फी भरत आणि त्यातून हलक्या आवाजात कुजबूज ऐकू येत, यार खरच यांनी पेशवाईला पळताभोई थोडी केली असेल.

मग माझ्यासारखा एकदा अवलिया जो…रा..त ओरडून म्हणत एकाने छपन्न हानले आणि अख्खे भुईसपाट केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आमच्या कवीने लिहिलेली अर्थपूर्ण गाण्यांच एक वेगळेपणाचा बाज होता.
1). मोडा परंतू…. वाकू नका रे …..गिरवा भीमाचा धडा…… समतेचा वाजवूनी…. चौघडा…..
2).उठा रे ……. दलितांनो जाऊ ……पळतं……. कलिंगड पिकलयं माझ्या ……. भीमाच्या….. मळ्यात …..
ही गाणी भारतीय समाज व्यवस्थेत शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक समानतेची व स्वाभिमानी आदर्शाचा पाया भरणी करणारा संदेश देणारी होती.

आमच्या घोषणाही फारच अफलातून होत्या. जीवनातील संपूर्ण वैभवाच्या वाटा अंधःकारमय झालेल्या मानसाच्या मनाला समतावादी व बुध्दाच्या शांततापूर्ण मानसिक विकासाच्या मानवी जीवनाचा नवीन आशेचा किरण दाखवणारे आहेत.

1).डॉ……बाबासाहेब……. आंबेडकरांचा…. विजय असो…..
2).आकाश…….. पाताळ एक करो …… बौध्द धम्म का स्वीकार करो………
3). डॉ.बाबासाहेब आंबेडकर …. कोणाचा …… सात कोटी सेनेचा.
4).जग मे…….. बुध्द का …… नाम है ……. यह ही भारत की शान ……. है ……
5). देशाच्या समतेचा पाया कोण है.
डॉ.बाबासाहब आंबेडकर है.
6). झाला रे झाला मुक्त झाला
माणुस गुलामगिरीतून मुक्त झाला.
7). बाबासाहेब करे पुकार बैध्द धम्म का करो स्वीकार
8). भिम लढला रे लढला कोणासाठी
तुमच्या आमच्या सामांन्यासाठी
9). आम्ही उभा कोणामुळे
आमचा बाप भिमा मुळे

त्या वेळेच्या आंबेडकरी विचारावरील निष्ठावंत लोक समूह मुळे अकाशाला गवसणी घालण्याचे बळ मानसात निर्माण झाले होते.
आज असा निष्ठावंत लोक समूह लोप पावला की काय ? असा गंभीर प्रश्न समोर उभा राहतो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची वर्गणी किती जयंतीची कार्यक्रम पत्रिका काय असावी त्यामध्ये किती व्याख्याने असावी ते वक्ते कोण असणार आहेत या बाबतीत कमीत कमी तीन चार तरी समाजाच्या बैठका होत असत.

मग तीनेक व्याख्याने व बिनीचे शिलेदार असलेले विचारवंत वर्गणीचा रक्कम किती, मंडप रोषणाई कशी या सर्व विषयावर सार्वमत एक होऊन ठरवले जात असे शेवटी मागील वर्षीच्या जमा खर्चास मंजूरी देऊन शिल्लक रक्कमेचे नियोजन ठरवून बैठक संपन्न होत असे.

चालू वर्षीच्या कामास तरूण वर्ग फारं च उत्साहाने लागलेला असत. लेझीम संघाचा सराव करणे. पताका व झुरमुळ्या बनविने अशी एक ना अनेक कामे तरुणाईच्या मगे असायची. याला समाजातील वडीलधारी मंडळी ही साथ देत असत. पण ज्यांचे शिक्षण सुरू आहे. त्यांना थोडा त्रास होत असत. कारण १० वी १२ वी पुढील उच्च वर्गाच्या परीक्षेचा काळ असायचा मग वाद्य कामामुळे होणा-या त्रासापासून सुटका करण्यासाठी कोण कॉलेजात तर, कोण गार्डन वा स्मशानभूमीत जाऊन अभ्यास करीत बसत असत. मग रात्री घराला आले तर आले नाही तर त्यांच्या सवडीनुसार येत जात असत. हे सर्व निष्ठा आणि विश्वासाचे प्रतिक प्रदर्शन आहे. मग एकदाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक झाली का ? सर्व समाज सार्वजनिक ठिकाणी जेवण करीत असे जेवणात गव्हाची खिर किंवा लाप्शी व वांग्यावर बटाटा मिक्स भाजी असायची, सहभोजन झाले की एकदाचा सर्व कार्यक्रम निर्विघ्न पार पडला म्हणून आनंद व्यक्त करीत असे. हे विसरून कसे चालेल ही तर खरी आमच्या नव जीवनाची संस्कृती आहे.
पण आता असा काही खटाटोप नाही .

कोण तर भाऊ, दादा , एकदा स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष, अण्णा आणि नाहीच काही जमले तर शेवटी स्थानिक नगरसेवक मग त्याची विचार धारा कोणती का असेना ते आम्हाला चालतात. कारण आमच्या बापाचा जयंती उत्सव फेल नाही गेला पाहीजे.

ज्या आपल्या बापाने तात्विक आणि नीतीमुल्याचा विरूद्ध जाऊन आपल्या विकासाच्या आड येतात आणि विरोध करतात त्यांची मदत तर घेतलीच नाही. पण त्याच्या आडचणीच्या काळात इतकी मदत केली की, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या मानसाच्या उपकाराच्या ओझ्याखाली मरे पर्यंत जगावे लागले आहे, असे बरेच उच्च जातीचे लोक आहेत.
1). पुण्यातील केसरी हा मुळचा बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या मालकीचा तो टिळकांना राहण्यासाठी दिला होता, त्या वास्तूवर टिळकांच्या मरणानंतर अख्खे पुण्याचे बामण हक्क सांगत होते. तो श्रीधरपंत ठिळक व ब्राह्मण मंडळ पुणे या खटल्याचा निकाल वाचावा
2). रा. धो. कर्वे यांच्या वतीने बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोर्टात केस लढली आहे. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवलेले आहे.
असे अनेक प्रसंग देशभरातून घडलेले आहेत.

ज्यांची आपण आपला सांस्कृतिक बाप म्हणुन ओळख सांगतो. त्यांचा त्याग, त्यांनी सोसलेल्या मरण यातना, त्यांनी दिलेले सामाजिक संदेश, हे कधी आपणास आठवतात का ? आपण या बाबतीत कधी अंतर्मुख होऊन विचार केला आहे का ? निदान आता अत्यंत धोकादायक वेळ आलेली आहे. आतातर शहाणपण सुचेल का? मग तो राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय संस्थापक सर्व व्हीआयपी कार्यकर्ते कोणीही असो
भारतीय जातीव्यवस्थेने बहिष्कृत केलेल्या नाही रे वर्गाची प्रेरणा स्फूर्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.

लेखक- राजकुमार सावंत, नाशिक.
7887952215

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *