Breaking News

परभणीतील आंदोलक भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिस कोठडीतच मृत्यू राज्यघटना विटंबनाप्रकरणी आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कोंबिग ऑपरेशननंतर पोलिस कोठडीत मृत्यू

मागील दोन दिवसांपूर्वी परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेच्या विटंबनाप्रकरणी परभणीत दलित समुदायाकडून प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनावर दग़डफेक आणि काही ठिकाणी दुकानाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या वस्तूंना आगी लावण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आंदोलकांना अटक करण्यासाठी संध्याकाळी पोलिसांनी सुरु केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये अनेक तरूणांना अटक केली.

कोंबिग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या वडार समाजाच्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यास नंतर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर अटक केलेल्या तरूणांना सोमनाथ सुर्यवंशीसह इतरांनाही नंतर जामीनही मंजूर करण्यात आला. परंतु सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचे वृत्त कळाल्यानंतर परभणीतील भिम सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर धाव पोलिस स्थानकाकडे आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी धाव घेतली.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणाले की, परभणीत वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक, वेदनादायक आणि असह्य आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे याहून असहनीय काय ! असा उद्विग्न सवाल केला.

पुढे प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, त्याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये होते आणि फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी विभाग दोन्हीकडून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण करून ते केले जाते. पण आम्ही न्यायासाठी लढू ! असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *