नथुराम गोडसे हा नीच, नालायक ब्राम्हण होता, त्याने महात्मा गांधी यांच्यातील महात्म्याला ठार मारले, पण आजचे हिंदूत्ववादी नथुराम गोडसे याची मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कृत्य आहे. तसेच पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो असे वक्तव्य माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना केले.
अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात वाडःमय विलास गौरवग्रंथ व विलास तायडे लिखित बैलबंडी ते हवाई दिंडी पुस्तक प्रकाशन समारंभ रविवारी आयोजित करण्यात आलो होता. त्यावेळी श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान वरील वक्तव्य केले.
यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी ब्राम्हण समाजावर टीका करत हिंदूत्ववाद्यांवरही तोंडसुख घेतले.
यापूर्वीही श्रीपाल सबनीस पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यावेळी श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. डॉ श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले. राजकारणावर भाष्य करत राजकिय नेत्यांचा रोष अंगावर ओढावून घेतला. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत मोठा वाद अंगावर ओढावून घेतला होता. तसेच श्रीपाल सबनीस यांनी माजी राज्यपालांवरही टीका केली होती. आता पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, श्रीपाल सबनीस यांनी अकोल्यातील अकोट येथे बोलताना म्हणाले की, नथुराम गोडसे हा नीच नालायक ब्राम्हण होता. या माणसाने महात्मा गांधी यांच्यातील महात्माला मारले. त्याचे हे आजचे हिंदूत्ववादी डोक्यावर टीळा लावून फिरत आहेत. नथुराम गोडसे याचे पुतळे उभारत आहेत, मंदिर उभारत आहेत. हे धर्मकार्य नव्हे तर धर्मघातकपणा आहे. अशा धर्मापासून देशाचे रक्षण करण्याची खरी गरज असल्याचे मत व्यक्त करत त्यामुळे विवेकी धर्मनिष्ठ हा विचार महत्वाचा असल्याची स्पष्टोक्ती देत मी पूर्वजांच्या पापबद्दल आज तुमच्यासमोर माफी मागतो असेही यावेळी सांगितले.