Breaking News

उद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनी

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

अनुसूचित समाजाच्या जातीतील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदार या कर्जासाठी अर्ज करू शकतात. विहित कालावधीत जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, या पत्त्यावर अर्ज व मूळ दस्तावेजासह स्वत: साक्षांकित करून सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२- २६५91124 अथवा [email protected] यावर संपर्क साधावा, असे कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Namo Bharat : आज देशातील पहिली हाय-स्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ देशाला सुपूर्द करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली-मेरठ मार्गावर या प्रकल्पाचे पाच टप्पे आहेत. उद्घाटनापूर्वी या ट्रेनची ट्रायल रन करण्यात आली आहे. याने ताशी 152 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचा आकडा गाठला.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पहिली हायस्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *