Breaking News

अध्यक्षीय भाषणातून डॉ तारा भवाळकर यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर नाव न घेता टीका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर नाव न घेता मोदींवर केली टीका

आजही एखादी व्यक्ती माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा असा सवाल करत ? संमेलाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता खोचक शब्दात टीका केली. त्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर डॉ तारा भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ही टीका केली.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी कधी आपणास वाटते की, माझी आई जिवंत होती तो पर्यंत मल काही वाटत नव्हते. मात्र ती निघून गेल्यानंतर माझा जन्म जैविक पद्धतीने झाला असे वाटत नाही, तर मला परमात्माने पाठवले असून आज जे काही घडत आहे ते त्या परमात्म्याकडून माझ्या हातून घडविले जात आहे. तसेच ईश्वराचे त्याचे कार्य करण्यासाठी पाठवले असल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरून बरीच टीका झाली होती.

अखिल भारतीय संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर पुढे बोलताना म्हणाल्या की, शिवला तर विटाळ होतो, दुसऱ्या स्त्रीचा, निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी, पण त्याला विटाळ मानायचं, आता ही बाई कुठल्या शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्री मुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली सिमोन दा बोव्हा माहित नव्हती, ती काय म्हणते, देहाचा विटाळ, देहिच जन्मला, शुद्ध तो जाहला कणव प्राणी, उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही, जगी असा मला एखादा माणूस दाखवा, जो विटाळाच्या स्थानातून जन्मला आला नाही असेही सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना डॉ तारा भवाळकर म्हणाल्या की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा विषय वेगळा आहे. परंतु त्याचा भंडाफोड, या आमच्या संत कवियित्रीनी १३ व्या आणि १४ व्या शतकात केला आहे. ज्यावेळेला लीपी आणि लिहिण्यावाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हतं, स्त्री मुक्तीच्या उद्धात्या, आणि झेंडा फडकावणाऱ्यांच म्हणायचं की नाही म्हणजे आजच्या स्त्री मुक्ती विचारांना मागे सारतील अशा प्रकारचे विचार आमच्या स्त्रीयांनी संत स्त्रियांनी वेगवेगळ्या जाती जमातीच्या स्त्रियांनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या आहेत. त्या जातीच्या स्त्रिया ज्यावेळी बोलतात त्यावेळेस त्यांची विचारशक्ती, आणि संवेदनशीलता, भाषेवरच त्यांचे प्रभूत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत, असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना डॉ तारा भवाळकर म्हणाल्या की, प्रतिभा ही महिलांमध्येच उपजत निर्मितीच्या दृष्टीने ज्याला आपण कला म्हणत असतो, ती कला म्हणजे, संवेदनशीलता नेक्या शब्दात मांडण, ती अनुभवातून परिपक्व होते, त्या इतिहासाच्या प्रवाहाकडे आपण पाहणार आहोत की नाही असा सवाल उपस्थित करत हा मुद्दा महत्वाचा आहे. त्या मुद्याकडे लक्ष न देता आपण पुढे चाललो आहोत, आणि आम्ही सुधारलेले आहोत, अस आपण म्हणत असतो असेही यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *