Breaking News

श्याम मानव यांचे आव्हान स्विकारत धीरेंद्र महाराज म्हणाले, पण रायपूरला या नागपूरात येणार नाही

नागपूरात येत दिव्यशक्तीच्या आधारे एका वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीच्या चुलत्याचे नाव आणि त्यांच्या वडीलाचे नाव आणि त्याच्या नातेवाईकांच्याबाबत जाहिर माहिती दिली. त्यास त्या प्रतिनिधीनेही सांगत असलेली माहिती खरी असल्याचे सांगितले. या घटनेनंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज यास आव्हान देत तुमची दिव्यशक्ती सिध्द करा आणि ३० लाखाचे बक्षिस मिळवा असे सांगत दिव्यशक्ती सत्य असेल तर तुमच्या पायावर डोके ठेवेन असे असे जाहिर करत या गोष्टी पुन्हा नागपूरात येऊन सिध्द करण्याचे आव्हान दिले.

मात्र नागपूरातून गेलेल्या धीरेंद्र महाराजाने तेथील त्यांच्या दिव्य दरबारात श्याम मानव यांचे आव्हान स्विकारत असल्याचे जाहिर करत पण आपण नागपूरला येणार नाही तर तुम्हाला रायपूरला यावे लागेल असे प्रतिआव्हान दिले.

त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि ३० लाख रुपये घेऊन जावे, असे आव्हानच श्याम मानव यांनी दिले आहे. हे आव्हान दिल्यानंतर महाराज इरेला पेटले. त्यांनीही श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले आहे. मी चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या, असे आव्हानच धीरेंद्र महाराजने दिले. तर, श्याम मानव यांनी नागपूरमध्ये पत्रकार भवनात त्यांनी चमत्कार सिद्ध करावा. ऐनवेळी आम्ही त्यांच्यासमोर दहा लोक ठेवू. या दहा लोकांचे नाव, वय, फोन नंबर आणि आईवडिलांची नावे त्यांनी सांगावीत, असे म्हटले आहे.

दरम्यान, दिव्यशक्तीच्या आधारे धीरेंद्र महाराज पुन्हा नागपूर येऊन सिध्द करणार की श्याम मानव हे आपल्या टीमसह रायपूरला जाणार हे आगामी काळात स्पष्ट होवून कोण कोणाचा भोंदूपणा उतरविणार याची उत्सुकता मात्र महाराष्ट्रासह देशातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

Check Also

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

आगामी आर्थिक वर्षात नवे  महिला  सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *