Breaking News

भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये केलेल्या धर्मातंरास ६६ वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला आहे. दिक्षाभूमी परिसरात राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यावरून हा वाद उफाळला असून दिक्षाभूमी परिसर राजकीय मंच झाल्याची टीका करीत भारतीय बौद्ध महासभेने (दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) येत्या ५ ऑक्टोबर रोजी नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन बोलावले आहे .

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दिक्षभूमी स्मारक समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निमंत्रण दिल्यावरून भारतीय बौद्ध महासभेने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनीच स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ६६ वर्षांपूर्वी नागपूरला १४ आक्टोंबर १९५६ रोजी दिक्षा भूमीवर केलेल्या धम्मक्रांती मुळे देशामध्ये पुन्हा बौध्द धम्माचे धम्मचक्र प्रर्वतनास सुरुवात झाली आहे. त्या धम्मक्रांतीला गौतम बुद्धांचा शांतीच्या करुणेचा, समतेचा, विचाराचा देशामध्ये प्रचार आणि प्रसार होत आहे. भगवान गौतम बुद्धांची आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार, बौद्ध धनाचा प्रचार प्रसार करणे हा भारतीय बौद्ध महासभेचा मुख्य उद्देश्य आहे.

गेल्या ६६ वर्षा मध्ये भारतीय बौद्ध महासभा देशभरात विविध धम्म प्रशिक्षण शिविरे श्रामनेर शिबिरे, उपासक उपासिका शिबिरे, अशी २४ प्रकारांच्या शिबिरांचा माध्यमातून बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक निर्माण करून त्यांचा मार्फत हजारो शिलबद्ध कार्यकर्त्यांचे जाळे पसरविलेली आहे. त्यांचा माध्यमातून संपूर्ण देशातील वंचित, शोषित, ओबीसी, आदिवासी समाजाला विषमतेच्या अवस्थेतून आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मात्र नागपूरच्या दिक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने होत असलेले कार्यक्रम धम्माचे होतांना दिसून येत नसून दिक्षा भूमी राजकिय मंच झालेला आहे असा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केला.

त्यामुळे ६६ वर्षांनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रथमच दिक्षाभूमी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विभागाच्या मैदानात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटिल यांनी केले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *