Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्घाटन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट  ३, ४, ७ व ८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केले असून या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी आणि पर्यटक, अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौद्ध लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी  हा सर्कीट बनवण्यात आला आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले “पर्यटन संचालनालयाद्वारे व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने ६ डिसेंबर, २०२२ रोजी चैत्यभूमी दादर येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची माहिती देण्यात येणार आहे. हे सर्कीट पर्यटन संचालनालय, मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रामधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्ह्यात पर्यटकांसाठी राबविण्यात येणार आहे. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ च्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दादर येथील चैत्यभूमी, महाड येथील चवदारतळे, नाशिक येथील काळाराम मंदिर व नागपूर येथील दीक्षाभूमी येथे करण्यात येणार आहे.”

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालू

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *