Breaking News

लोकभारतीच्या कपिल पाटील यांच्या विरोधात शिवाजी शेडगे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शेंडगे यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिक्षक मतदारसंघ  निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकभारती आणि जनता दलचे आमदार कपिल पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे.

शिवाजी शेंडगे हे पेशाने शिक्षक असून गेली १८ वर्षे चारकोपच्या एकविरा विद्यालयात जुनिअर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. शिवाजी शेडगे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष असून शिक्षकांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत सातत्याने लढत आहेत. शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत १ तारखेला नियमित व्हावेत यासाठी शिवसेना आमदारांना एकत्रित करून विधान सभेच्या पायरीवर  लाक्षणिक उपोषण केले, आझाद मैदानात धरणे आंदोलन केले, कोर्टाची लढाई लढली व शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. विना अनुदानिक शाळांना २० टक्के अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी व अनुदानाची निकष पूर्ण केलेल्या शाळांना त्वरित १०० टक्के अनुदान द्यावे, २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. मातुभाषेतून शिक्षण देणारी एकही शाळा शेवटच्या विद्यार्थी असे पर्यंत बंद करू नये, शिक्षकांचे समायोजन त्यांच्या  जिल्ह्यातच व्हावे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा विविध न्याय मागण्यांबाबत शिवाजी शेंडगे यांनी शिवेसेना–शिक्षकसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने ही केली आहेत. शिक्षकांना कॅशलेस मेडीकल सुविधा मिळावी यासाठी सातत्यानी दोन वर्षे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सन २०१५ मध्ये शिवाजी शेंडगे यांच्या पँनेलने माध्यमिक शिक्षक कर्मचारी पगारदार पतसंस्थेची निवडणूक लढवली सर्वाधिक मते घेऊन शेंडगे यांच्यासह पँनल विजयी झाले होते. शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या पँनलचा शेंडगे यांनी त्या निवडणूकीत धुवा उडवला होता.

मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईन आणि शिवसेनचा भगवा फडकेल असा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेकडून नाशिकच्या शिक्षक मतदारसंघासाठी आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची यादीही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *