Breaking News

तोंड उघडायला लावू नका, अन्यथा तुमच्या नेत्यांना मोदी, मल्ल्यासारखं पळून जावं लागेल शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मला तोंड उघडायला लावू,  भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असा इशारा शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना दिला.

राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठविल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आल्यानंतर त्यास उत्तर देण्यासाठी शिवसेना भवनात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी काहीजण सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपाची माकडं अकारण कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असंही सांगितलं जातं आहे. धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत त्यांनी उत्तर दिले.

सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला असा आरोप करत या सरकारचे जे खंदे समर्थक आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु केले आहे. गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय. कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात असा आरोपही त्यांनी केला.

भाजपाला महाराष्ट्रात सत्तेपासून वेगळं ठेवल्यामुळे ईडीचा वापर केला जातो आहे. एक काळ होता की ईडी, सीबीआय, सीआडी या विभागांना एक प्रतिष्ठा होती. मात्र आता केंद्रातलं सरकार ईडीचा वापर हे आमच्यावर सूड उगवण्यासाठी करत आहे. कुणी नामर्दपणे असे वार करत असेल तर शिवसेनेला जशास तसं उत्तर देईल असे सांगत गेल्या तीन महिन्यांपासून भाजपाचे तीन लोक ईडीच्या कार्यालयात येत आहेत आणि जात आहेत. आम्ही कोणत्याही नोटिशीला घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील दिड महिन्यापासून ईडी आमच्याकडून कागदपत्रे मागवत आहेत. ती कागदपत्रे आम्ही त्यांना देत आहोत. मात्र अद्याप तरी ईडीने पीएमसी घोटाळ्याचा उल्लेख केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले ९ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *