Breaking News

नवाब मलिक म्हणतात राऊतांना, ही तर आता प्रेमाची सुरुवात शिवसेनेच्या राऊतांच्या शेर ला राष्ट्रवादीच्या नवाब यांचा मीर च्या शायरीने उत्तर

मुंबईः प्रतिनिधी
शिकाँरा आघाडीखालील सरकारच्या स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटाघाटी सुरु आहेत. या आघाडीसाठी वातावरण निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्टिटरवरून शेर-शायरी करत आहेत. मात्र राऊतांच्या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच प्रतित्तुर देत ही तर प्रेमाची सुरुवात असून रडतोयस का असा सवाल करत धीर दिला.
राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलात भेट झाली. या भेटीनंतर शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्टिटरच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका जाहीर करत होते. त्यासाठी बशीर बद्र, हरिवंशराय बच्चन, वसीम बरेलवी सारख्या ख्यातनाम शायर, कवींच्या ओळी शेअर करून शिवसेनेची भूमिका मांडत होते. मात्र त्यांच्या या शायरीला ना भाजपाने कधी उत्तर दिले ना कधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते.
मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी शायर बशीर बद्र यांची प्रसिध्द शायरी शेअर करत “यारो नये मोसम ने ये एहसान किया है, याद मुझे दर्द पुराने नही आते” या दोन ओळीतून नये मोसम म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना उपमा दिली आहे. तर दर्द पुराने अर्थात भाजपाची आठवण होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तितक्याच तडफेने उत्तर देत सुप्रसिध्द शायर मीर ताकी यांच्या “इब्तेदा ए इश्क है रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या” हा शेर शअर करत आपल्या प्रेमाची (शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस शिकाँरा) ची सुरुवात असल्याचे सांगत धीर देण्याचा प्रयत्न केला.

Check Also

राजस्थानात नरेंद्र मोदींचे हेट स्पीच; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे १७ तक्रारी मुस्लिम देशातील घुसखोर, हिंदूची मालमत्तेचे पुन्हा वाटप करण्याचा प्रयत्न

देशातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचत आहे. यापूर्वी केंद्रिय निवडणूक आयोगाने लेव्हल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *