Breaking News

शिवसैनिक फाळकेच्या आत्महत्येचे पडसाद जीएसटीमुळे आत्महत्या केल्याने शिवसेना भूमिकेत सुधारणा करणार का? काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकारने देशात जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे अडचणीत असलेल्या सर्वांना मदत करूनही केवळ लोकांनी फसविल्याने आत्महत्या करण्याची पाळी कराड येथील ३२ वर्षीय सराफ व्यापारी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्ये राहुल फाळके यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मात्र या आत्महत्येवरून विधानसभेत काँग्रेस व शिवसेनेत खडाजंगी झाली.

शिवसैनिक फाळके यांने केंद्र सरकारच्या दोन निर्णयामुळे आत्महत्या केल्याचे त्यानेच लिहून ठेवले आहे. त्याने घेतलेला निर्णय हा सरकारने घेतलेल्या एककल्ली, नियोजन शून्य व कोणतीही पूर्व तयारी न करता घेतलेल्या निर्णयाचा परिणाम असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना केली.

त्यामुळे शिवसेनेने त्याच्या आत्महत्येची दखल घेत, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यावर ही वेळ आल्याने तुमच्या भूमिकेत सुधारणा करणार का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

त्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी काँग्रेसकडून शिवसैनिक फाळके यांच्या आत्महत्येचे राजकारण करत आहे. त्याच्या मृत्यूची माहीती कळताच शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून २० लाख रूपयांची मदत दिल्याचे सांगत त्याच्या कुटुंबियांची जबाबदारी उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याची माहिती दिली.

तसेच केंद्रात जो अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. तो एका विशिष्ट राज्यासाठी आणण्यात आला आहे. त्यामुळे विखे-पाटील यांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार शिवसेना निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर विखे-पाटील यांनी हरकत घेत मी फक्त अविश्वास ठराव आणल्याचे सांगितल्याचे सांगत जे बोललो नाही ते माझ्या तोंडी घालू नका असा दम भरला.

त्यावर सुनिल प्रभू यांनी तसे असेल तर माझे शब्द मागे घेत असल्याचे सांगत राष्ट्रहितासाठी असेल तर शिवसेना सरकारच्या विरोधात मतदान करेल असे सांगत घटनेत तरतूद नसताना केवळ राज्यांना विशिष्ट दर्जा देण्याच्या उद्देशाने आणि राजकारण करण्याच्या अनुशंगाने काही जणांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्याबाजूने कदापीही शिवसेना मतदान करणार नसल्याचे जाहीर केले.

मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याप्रश्नी विखे-पाटील यांनी मांडलेली स्थगन प्रस्ताव नाकारला असल्याचे जाहीर केले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *