Breaking News

एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते काय मारतात का? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दादरा नगर हवेलीतील दहशतीला फोडली वाचा

सिल्वासा : वृत्तसंस्था-प्रतिनिधी

मला माहिती नाही म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्त निर्माण झालंय आणि काही लोक गांजा मारून काम करतात, हे दिसतय.. दसरा मेळव्यानंतर मला वारंवार दिसतय की, ज्या प्रकारे विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते काय मारतात का? त्यांना कुणी पुरवतं का? हे फार गरजेचं आहे. मला इथे (सिल्वासा) पण तेच दिसतय. इतक्या बेधुंदपणे कुणी कारभार करू शकत नाही असे वक्तव्य शिवसेना नेते तथा शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले.

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा नगर हवेलीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होत असून ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेनेही या पोटनिवडणुकीसाठी कलाबेन यांना शिवसेनेची उमेदवारी जाहिर केली. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सध्या सिल्वासामध्ये आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मोहन डेलकरांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांनीच उल्लेख केलेला आहे की, ज्या प्रकारे या संपूर्ण दादरा-नगर हवेली , सिल्वासा भागातील प्रशासन ज्या दहशतीच्या मार्गाने चालवलंय. मुळात दादरा-नगर हवेलीचा जो प्रशासक असतो, हा आयएएस अधिकारी असतो. एक अधिकारी असतो. हा केंद्रशासीत प्रदेश आहे. पण भाजपाच राज्य आल्यामुळे त्यांनी इथे एक राजकीय माणसाची सोय लावली. प्रफुल खेडापटेल हे गुजरात मंत्रिमंडळात मंत्री होते. ते निवडणूक हरले. मोदींच्या लाटेत निवडणूक हरले आणि त्याला प्रशासक म्हणून नेमले. ज्याला लोकांनी नाकारलं आहे गुजरातमध्ये त्याला इथे प्रशासक नेमले हे घटनाबाह्य आहे. आयएएस अधिकाऱ्याला इथे नेमावं लागते. पण मनमानी आणि मस्तवालपणा इथेही दिसतो. त्यातून इथे सगळं घडतय असा आरोप त्यांनी केला.

काल इथे मराठा समजाचा बैठक होती. अनेक लोक आली होती, इकडे मराठी समाज मोठ्याप्रमाणावर आहे. त्यांनी मला सांगितलं की इथे जर आम्ही मोहन डेलकरांबरोबर काम करतोय असं त्यांना दिसलं, तर ते आमच्या उद्योगधंद्यांवरती बालंट आणतात. आमच्या आर्थिक नाड्या आवळतात. आमची कामं बंद करतात. आमची दुकानं बंद करतात, आमची कंत्राटं रद्द करतात. ही कुठली लोकशाही? मी नागरिक आहे मला अधिकार आहे, कोणत्या राजकीय पक्षाचं काम करावं. मी कोणती राजकीय विचारश्रेणी स्वीकारावी हा मला अधिकार दिलेला आहे. पण या दादरा-नगर हवेली, सिल्वासामध्ये प्रशासक ठरवतो कोणी कोणत्या पक्षाचं काम करायचं. जसं महाराष्ट्राचे राज्यपाल ठरवतात, तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत ना मग मी तुमच्या फाईलवर सही नाही करणार. ही एक नवीनच प्रथा, पायंडा सुरू झालेला असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

Check Also

शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटींचा निधी

स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *