Breaking News

शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ? माजी मंत्री अर्जून खोतकर यांची माहिती

औरंगाबादः  प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार होवून ६ वा दिवस सुरु झालेला असतानाच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी दिली असली तर रविवारी ५ जानेवारी २०२० ला सत्तार हे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी सांगितले.
राजीनाम्याचे वृत्त पसरताच सत्तार यांनी औरंगाबादेतील अतिथी हॉटेलमध्ये स्वतःला कोंडून घेतले असून कोणत्याही नेत्यांशी भेटी आणि संवाद करण्याचे टाळत आहेत.
दरम्यान सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर हे प्रयत्न करत आहेत. मात्र सत्तार यांच्याकडून कोणताही प्रतिसाद त्यांना मिळत नाही.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे मुळचे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. विधानसभा निवडणूकी आधी भाजपात प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्फत त्यांनी सुरूवातीला भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपात नकारघंटा मिळाल्याने त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणूकीत सत्तार हे निवडूनही आले.
परंतु मी पुन्हा येईन वाल्यांना अर्थात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली. तसेच या आघाडीचे सरकारही स्थापन करण्यात पुढाकार घेतला. या सरकारमध्ये सत्तार यांना राज्यमंत्री पद मिळाले. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराला ५ दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्तार हे मंत्री पदावरून नाराजी असल्याचे सांगत राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली.
दरम्यान, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्या नाराजी नाट्यावर तिकट भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केली असून सत्तार हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून ते गद्दार असल्याचा आरोप केला.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *